वार्ताहर / मौजे दापोली
दापोली शहरानजीकच्या मौजेदापोली येथील संतोष महाजनयांच्या घरावर माकडांनी उड्या मारून पत्रे फोडले आहेत. सकाळच्या सुमारास ही घटना घडली. यात घरात झोपलेले लहान बाळ थोडक्यात बचावले असल्याचे समोर आले.
दापोली तालुक्यात वानरांचा वावर वाढला आहे. ग्रामिण भागातील ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कुणाच्या घराचे पत्रे तर भाजीपाला, नारळ, सुपारी यांचे नुकसान करत आहे. वानर, माकड त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ त्रस्त आहेत. गुरूवारी मौजेदापोली येथील संतोष महाजन यांच्या घरावर वानरांनी उड्या मारून घराचे पत्रे फोडले आहेत. त्यांच्या घरात झोपलेले लहान बाळ होते. त्याच्या बाजूला जावून पत्र्याचे टोकदार भाग पडले. त्यामुळे या वानरांवर वनविभागाने कार्यवाही करून बंदोबस्त करण्याची मागणी आता मौजेदापोली पंचक्रोशीतून होत आहे. तर इतर ग्रामिण भागातूनही अशीच मागणी जोर धरत आहे.