प्रतिनिधी /म्हापसा :
खासगी इस्पितळातून म्हापसा जिल्हा आझिलो इस्पितळात एक इसम उपचारासाठी पॅज्युअलटीमध्ये आणला असता त्याचा मृत्यू झाल्याने त्याची कोविड चाचणी केली असताना तो पॉझिटिव्ह आढळल्याने म्हापसा जिल्हा आझिलो इस्पितळात एकच घबराहट निघाली. त्याच्याबरोबर एकूण 50 जण बरोबर होते. मात्र ते सर्वजण गायब झाल्याने त्यांचा शोध चालू आहे. दरम्यान सायंकाळपर्यंत म्हापसा शहरात मंगळवारी एकूण 11 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याचे नोंद झाले आहे. मृत्यू झालेला इसम पॉझिटिव्ह आढळल्यान म्हापशात पहिला पॉझिटिव्ह मृत्यरुग्ण नोंद झालेला आहे.
खोर्ली सीम बायपास इमारतीत राहणारा इसमाला अतिताप आल्याने त्याला त्याच्या कुटुंबियांनी येथील खासगी इस्पितळात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरने काल रात्री त्याला म्हापसा जिल्हा आझिलो इस्पितळात नेण्यास भाग पाडल्याने त्याला जिल्हा आझिलो इसिपतळात आणले असता तो मृत पावला. त्यानंतर त्याची डॉक्टरांनी स्लेब चाचणी घेण्यात आली. त्याचा आज सकाळी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने येथील आझिलो इस्पितळात एकच धावपळ उडाली. सध्या त्याचा मृतदेह प्लास्टिकमध्ये गुडाळून शवगृहात ठेवण्यात आला आहे.
या इसमाची निधनाची माहिती मिळाल्यावर सुमारे 50 लोकांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी भेट दिली. त्या 50 लोकांचा शोध आरोग्य खाते आणि उपजिल्हाधिकारी कार्यालयातून होत आहे. दरम्यान डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार आरोग्य खाते ज्यांच्या शेजारी व कुटुंबियांची स्लेब चाचणी घेणार आहे तसेच या इमारतीत सुपर मार्केट, रेस्टॉरंट, खाद्य विक्री दुकाने, डॉक्टर, वकील यांची कार्याल्ये आहेत. या सर्वांचे सेनिटायझेशन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान मंगळवारी करासवाडा म्हापसा येथे 3, खोर्ली येथे 1, एकतानगर येथे 1, शेटय़ेवाडा धुळेर 1, व कुचेली येथे 5 रुग्ण पॉझिटिव्ह बाधित झाले आहेत.
दरम्यान सकाळी उपजिल्हाधिकारी मामू हेगे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हापशातील अधिकारी वर्ग, नगराध्यक्ष, नगरसेवक यांची एक संयुक्त बैठक कोविड 19 बाबत चर्चा करण्यासाठी होऊन कोरोना रुग्ण आढळल्यावर कोणती खबरदारी आणि उपाययोजना घ्यावी याबाबत चर्चा करण्यात आली व याविषयी उपजिल्हाधिकाऱयांनी माहिती दिली.