प्रतिनिधी /म्हापसा
खोर्ली म्हापसा येथील घाटेश्वर मंदिराजवळील उतरणीवर आज सकाळी लग्नाच्या वारातीतील लोकांना घेऊन आलेली बस रस्त्याच्या बाजूला कलंडली. यात सुदैवाने जीवितहानी किंवा जखमी झाले नसल्याची माहिती म्हापसा पोलिसांनी दिली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जीए 07 एफ 5801 ही माऊली शांतादुर्गा नामक प्रवासी बस लग्नाच्या वरतातील लोकांना घेऊन आली होती. त्यांनी खोर्ली म्हापसा येथील घाटेश्वर मंदिराच्या सभागृहाकडे लोकांना उतरवून बस मागे घेते वेळी ती रस्त्याच्या कडेला कलंडली. सदरची बस दामोदर परशुराम गावस (62 चिंबल ) हा चालक बस चालवत होता. या अपघाताचा पंचनामा हवालदार उल्हास नाईक यांनी केला.