कला अकादमी व श्री महालसा संस्थानचे संयुक्त आयोजन भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांच्या स्मृतीनिमित्त उपक्रम

प्रतिनिधी /पणजी
कला अकादमी गोवा आणि श्री महालसा संस्थान, म्हार्दोळ यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी ‘स्वर्गीय स्वरांना स्वरांजली’ हा कार्यक्रम सोमवार दि. 7 रोजी सायं. 7.30 वा. म्हार्दोळ येथील श्री महालसा संस्थानच्या प्रांगणात उभारलेल्या खास खुल्या रंगमंचावर आयोजित करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रम कला व संस्कृती सचिव संजय गिहार (आय.ए.एस), श्री महालसा संस्थानचे अध्यक्ष श्रीवल्लभ पै रायतुरकर व स्वस्तिक कल्चरल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रविण गांवकर यांच्या सन्माननीय उपस्थितीत होणार आहे.
या कार्यक्रमात गोव्यातील आघाडीचे गायक कलाकार समीक्षा भोबे काकोडकर, गौतमी हेदे बांबोळकर, समृध्द चोडणकर व सुधाकर शानबाग सहभागी होणार असून रोहित बांदोडकर, अवधूत च्यारी, प्रकाश आमोणकर, अनिकेत दड्डीकर व ओलाफ फर्नांडिस हे कलाकार साथसंगत करणार आहेत. विष्णू शिरोडकर यांनी या कार्यक्रमाचे संगीत संयोजन केले आहे. निवेदन सिध्दी उपाध्ये करणार आहे. सदर कार्यक्रम सार्वांसाठी खुला असून कोविड-19 च्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून संगीत रसिकांनी भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी या कार्यक्रमास मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.