बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूरच्या एका विशेष न्यायालयाने सोमवारी तामिळनाडूच्या तीन रहिवाशांना म्हैसूर जिल्हा न्यायालयात ऑगस्ट २०१६ च्या स्फोटात सहभागी झाल्याबद्दल दोषी ठरवले आहे.
राष्ट्रीय अन्वेषण एजन्सी (एनआयए) न्यायालयाने आरोपी नैन्नर अब्बास अली यांना सात वर्षे सक्तमजुरी आणि तीन वर्षे साधी कैद (एकूण १० वर्षे), एम. सॅमसन करीम राजाला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तर दाऊद सुलेमानला सात वर्षे सक्तमजुरी आणि तीन वर्षे साधी कारावास (एकूण १० वर्षे) शिक्षा भोगावी लागणार आहे.
१ ऑगस्ट,२०१६ म्हैसूर जिल्हा न्यायालयात झालेला स्फोट हा ‘बेस मूव्हमेंट’च्या सदस्यांनी केलेल्या पाच स्फोटांपैकी एक होता, जे एनआयएच्या मते, अल कायदाशी संबंधित आहे.