13 अटी घालून दिली परवानगी, आरतीसाठी केवळ पाच जणांना परवानगी, मूर्तींची उंची-पीओपीवरही बंधने
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवावर कमालीच्या मर्यादा लादण्यात आल्या आहेत. जिल्हा दंडाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी 13 अटी घालून उत्सवाला परवानगी दिली असून घरगुती गणेशोत्सवाबाबतीत सौम्यपणा दर्शविण्यात आला आहे. तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडपाऐवजी जवळच्या मंदिरात श्रींची प्रति÷ापना करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
बुधवारी सायंकाळी जिल्हाधिकाऱयांनी यासंबंधी एक आदेश जारी केला आहे. पोलीस आयुक्त, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीसप्रमुख, महानगरपालिका आयुक्त, जिल्हा नगरविकास विभाग, सर्व प्रांताधिकारी, तहसीलदारांवर या आदेशाच्या अंमलबजावणीची जबाबदारी देण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱयांविरुद्ध आपत्ती निवारण कायदा-2005 व भादंवि 188 अन्वये कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकाऱयांनी दिला आहे.
गणेशोत्सवासाठी 13 अटी घालण्यात आल्या आहेत. उत्सव केवळ दहा दिवसांवर येऊन ठेपला असता मूर्त्यांची उंची ठरविण्यात आली असून पीओपी गणेशमूर्तींवर बंदी घालण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱयांनी जाहीर केले आहे. जिल्हय़ातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त लोक जमतील, असे कार्यक्रम, उत्सवावर बंदी घालण्यात येत आहे. सार्वजनिक श्री मूर्तींची प्रति÷ापना मंडपाऐवजी जवळच्या मंदिरात करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱयांनी केल्या आहेत.
परवानगीबाबत दिलेल्या सूचना खालीलप्रमाणे-
1) देवस्थान मंडळ व सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सवासाठी पोलीस, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, हेस्कॉम, आरोग्य, अग्निशमन, प्रदूषण नियंत्रण मंडळ व इतर संबंधित खात्यांची परवानगी घेणे सक्तीचे आहे.
2) कोविड-19 महामारीचा फैलाव वाढतो आहे. त्यामुळे पोलीस, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, हेस्कॉम, आरोग्य, अग्निशमन दल, प्रदूषण नियंत्रण मंडळ व इतर संबंधित खात्यांकडून दिल्या जाणाऱया सूचनांनुसार निर्बंधित प्रदेशाबाहेर असणाऱया मंदिरात यावषी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करता येईल. मात्र, डॉल्बी, फटाक्मयांची आतषबाजी व गुलाल वा इतर रंग उधळण्यास सक्त मनाई आहे. साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करायचा आहे.
3) घरात प्रति÷ापना करण्यात येणाऱया श्रीमूर्तीची उंची आसनासह दोन फुटापेक्षा जास्त असू नये व देवस्थानामध्ये प्रति÷ापना करण्यात येणाऱया श्रीमूर्तीची उंची आसनासह 4 फुटापेक्षा अधिक असू नये. पीओपीच्या मूर्तींवर सक्तीने बंदी असणार आहे. माती किंवा शाडूपासून तयार केलेल्या मूर्तींची प्रति÷ापना करावी.
4) घरगुती श्री मूर्तींचे विसर्जन आपापल्या घराच्या आवारात करता येईल, याची व्यवस्था करणे. जर अशी व्यवस्था झाली नाही तर महानगरपालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून तयार केलेल्या फिरत्या पाण्याच्या टाकीत विसर्जन करावे. जर यंदा श्रीमूर्तीचे विसर्जन करता आले नाही तर पुढील वषीच्या भाद्रपद महिन्यात विसर्जन करावे. त्यामुळे प्रति÷ापना व विसर्जनाच्या वेळी होणारी गर्दी रोखता येते व कोरोनाचा फैलाव रोखता येतो.
5) गणेशोत्सवाच्या काळात देवस्थान व गणेशोत्सव मंडळांनी कोणत्याही परिस्थितीत गर्दी होईल अशा फलकांचे प्रदर्शन करू नये. कोविड-19 महामारीविषयी जनजागृती करणाऱया, सामाजिक, आरोग्यविषयक संदेश देणाऱया फलकांना प्राधान्य द्यावे.
6) सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजन, भजन, कीर्तन व इतर धार्मिक कार्यक्रमांच्या बदल्यात आरोग्यविषयक कार्यक्रमांचे आयोजन करावे. कोरोना, मलेरिया, डेंग्यू आदींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्राधान्य द्यावे. सार्वजनिक स्वच्छतेविषयी जागृती करण्याबरोबरच ध्वनीक्षेपकामुळे ध्वनीप्रदूषण होऊ नये, यासाठी सरकारी नियमांचे पालन करावे.
7) आरतीच्यावेळी जास्तीत जास्त 5 जण असतील याची खबरदारी घ्यावी.
8) नागरिकांना श्रीमूर्तीच्या दर्शनाचा लाभ व्हावा, यासाठी केबल नेटवर्क, वेबसाईट, फेसबुक आदी समाजमाध्यमांवर व्यवस्था करावी.
9) ज्या मंदिरात श्री मूर्तीची प्रति÷ापना केली जाते त्या मंदिरात रोज सॅनिटायझेशन करावे. दर्शनासाठी येणाऱया भाविकांचे थर्मल स्क्रिनिंग करणे व त्यांना सॅनिटायझर देण्याची व्यवस्था करावी. किमान 6 फूट सामाजिक अंतर राखावे. मंदिरात येणाऱया भाविकांनी मास्क परिधान करणे व इतर नियमांचे पालन करणे सक्तीचे आहे.
10) श्री प्रति÷ापनेवेळी व विसर्जनावेळी कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढू नये. आरती व इतर पूजाविधी आपापल्या घरी व मंदिरातच करावेत. श्री विसर्जनाच्या ठिकाणी गरज भासली तरच तेथे रहावे. अनावश्यकपणे तेथे कोणीही थांबू नये. आरोग्याच्या हिताच्यादृष्टीने लहान मुले, ज्ये÷ नागरिक, आजारी व्यक्तींनी प्रति÷ापना किंवा विसर्जनाच्या ठिकाणी जाऊ नये याची खबरदारी घेणे. देवस्थानात प्रति÷ापना करण्यात येणाऱया श्री मूर्तींचे विसर्जन एकाचवेळी करू नये.
11) विसर्जनाच्या दिवशी जवळच्या मार्गाचा वापर करून विसर्जन तलावाकडे पोचावे. महानगरपालिकेच्यावतीने निश्चित करण्यात आलेल्या तलावात किंवा फिरत्या पाण्याच्या टाकीमधून श्री विसर्जन करण्यात यावे.
12) कोविड-19 महामारी थोपविण्यासाठी व नागरिकांच्या आरोग्याच्या हितदृष्टीने सरकार, जिल्हा प्रशासन, पोलीस, महानगरपालिका, आरोग्य, प्रदूषण नियंत्रण मंडळ, अग्निशमन दल आदी खात्यांकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱया सूचना व नियमांचे सक्तीने पालन करावे.
13) नवी दिल्ली येथील आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याच्या सहसचिवांनी दि. 4 जून 2020 रोजी पत्रांच्या माध्यमातून दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे व वेळोवेळी काढल्या जाणाऱया आदेशांचे व दिल्या जाणाऱया सूचनांचे पालन करावे.