मंगाई देवी यात्रोत्सव या वषीही साधेपणाने

बेळगाव / प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र साजऱया होणाऱया यात्रा-उत्सवावर बंदी असल्याने वडगाव येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत होणारी मंगाई देवीची यात्रा मंगळवारी साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. निवडक पुजारी, मानकरी यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडला. यात्रेनिमित्त मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. भाविकांना प्रवेश देण्यात न आल्याने मागील वषी प्रमाणे यावषीही भाविकांना घरातूनच देवीचे दर्शन घ्यावे लागले.
मंगळवारी यात्रेचा मुख्य दिवस असल्याने परंपरेप्रमाणे वडगावच्या परिसरातून ढोलवादन करीत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर देवीची विधिवत पूजा- अर्चा करून अभिषेक करण्यात आला. चव्हाण- पाटील कुटुंबियांच्यावतीने देवीचे गाऱहाणे उतरविण्यात आले. त्यानंतर कोणत्याही भाविकाला प्रवेश देण्यात आला नाही. त्यामुळे बॅरिकेड्स लावण्यात आलेल्या ठिकाणापासून हात जोडून भाविकांना माघारी परतावे लागले.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
कोरोनाचे संकट असल्याने काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी चोख बंदोबस्त असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार मंदिराकडे जाणारे सर्वच मार्ग बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले. तसेच ठिकठिकाणी पोलिस उभे करण्यात आले होते. शहापूर पोलिस स्थानकाचे निरीक्षक राघवेंद्र हवालदार जातीनिशी मंदिर परिसरात उपस्थित होते. मानकरी वगळता इतर कोणत्याही व्यक्तीला मंदिर परिसरात फिरकू देण्यात आले नाही. याबद्दल काही भक्तांनी नाराजी व्यक्त केली असली तरी सध्याची परिस्थिती पाहता बंदोबस्त गरजेचा असल्याचे मानकऱयांमधून सांगण्यात येत होते.
कोंबडय़ांची मागणी वाढली
मंगाई यात्रेच्या पार्श्वभूमीवर दरवषी मोठय़ा प्रमाणात बकऱयांची मागणी वाढते. परंतु या वषी यात्रेची परवानगी नसल्याने वडगावच्या भाविकांनी घरीच आपल्या कुटुंबासोबत यात्रा साजरी केली. यामुळे गावठी कोंबडय़ांना मंगळवारी मागणी वाढली. वडगाव परिसरात ठिकठिकाणी कोंबडय़ा विक्री करणारे दृष्टीस पडत होते. 500 रूपयांपासून पुढे कोंबडय़ांची विक्री करण्यात आली.
युवराज पाटील (देवीचे मानकरी)

बेळगावमधील एक मोठी यात्रा म्हणून मंगाई देवीची यात्रा प्रसिद्ध आहे. दरवषी हजारो भाविक कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यातून येतात. परंतु मागील वर्षाप्रमाणेच या वषीही यात्रा रद्द करावी लागली. देशात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे संकेत असल्याने या वषी मंदिरात नागरिकांना प्रवेश नाकारण्यात आला.
माधवी पाटील (भाविक )

दरवषी शेकडो भाविक मंगाई देवीच्या दर्शनाला येतात. लोकांची श्रद्धा असल्याने दरवषी भाविकांच्या संख्येत वाढ होत आहे. परंतु कोरोनामुळे यात्रेवर बंधने येत असल्याने भाविकांना घरात राहूनच देवीची पूजा करावी लागत आहे. कोरोनाचे हे संकट दूर होवून पुढील वषी प्रत्येकाला देवीचे दर्शन घेता येवो.
योगेश पाटील (देवीचे मानकरी)

सलग दुसऱया वषी कोरानामुळे यात्रा रद्द करावी लागली. परंतु परंपरा खंडित होवू नये यासाठी धार्मिक विधी करण्यात आले. मंगळवारी चव्हाण- पाटील कुटुंबियांच्या उपस्थितीत गाऱहाणे उतरविण्यात आले. जिल्हा प्रशासन व पोलिसांच्या सूचनेने कोणत्याही भाविकाला मंदिर परिसरात प्रवेश देण्यात आला नाही.