नवी दिल्ली : दुचाकी वाहन क्षेत्रातील कंपनी यामाहा मोटर्सने भारतातील आपल्या एफझेडएस 25 आणि एफझेड 25 बाईक्सच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सदरच्या दोन्ही दुचाकींच्या किंमतीत तात्काळ घट करण्यात आली आहे. दोन्ही दुचाकींच्या अनुक्रमे किंमती 19 हजार 300, 18 हजार 800 रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) इतक्या कमी करण्यात आल्या आहेत. मध्यंतरी अंतर्गत खर्च वाढल्याच्या कारणास्तव दुचाकींच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली होती. पण आता अंतर्गत खर्चावर मर्यादा आणण्यात आली असल्याने किंमती कमी करण्यात आल्याचे कंपनीने सांगितले.
Previous Articleकॅफे सांभाळताहेत ऍसिड हल्ल्याच्या पीडिता
Next Article शांतीसारखे सुख नाही
Related Posts
Add A Comment