किएव्ह / वृत्तसंस्था
गेले दोन आठवडे जगाच्या चिंतेचा विषय असलेला युक्रेन तणाव निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. युपेनवर आक्रमण न करण्यास रशिया तयार झाला असून अमेरिकेशी तिची चर्चाही होण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडन हा तणाव निवळण्यासाठी पुढाकार घेत आहेत, असे दिसत आहे.
रशियाने युक्रेनवर आक्रमण न करण्याचा शब्द दिल्यास आपण पुतीन यांना भेटण्यास तयार आहोत, असा संदेश बायडन यांनी रशियाला पाठविल्याची चर्चा आहे. त्यानंतर रशियानेही आपले धोरण काहीसे सौम्य केल्याचे स्पष्ट होते. तथापि, तणाव निवळण्याची शक्यता असली तरी तो लवकर संपण्याची चिन्हे मात्र नाहीत. त्यामुळे परिस्थिती अद्यापही संवेदनशील असल्याचे तज्ञांचे मत आहे.
हल्ल्याचा इशारा
युपेनवर रशियाने हल्ला केल्यास रशियाच्या महत्वाच्या शहरांवर हल्ला होऊ शकतो. मॉस्को, सेंट पीटर्सबर्ग आदी मोठय़ा शहरांवर अमेरिका वायुहल्ले करु शकते, असा इशारा रशियातील अमेरिकेच्या दूतावासाकडून अप्रत्यक्षरित्या देण्यात आला. या शहरांमध्ये जाऊ नका अशी सूचना अमेरिकेने आपल्या नागरीकांना दिली. तसेच रशियाला गेलेल्या पर्यटकांना सावध रहण्याचा संदेश देण्यात आला.
बायडन-मॅक्रॉन चर्चा
अमेरिकेने रशियाशी संपर्क ठेवत असतानाच युरोपातील इतर देशांच्या नेत्यांशीही चर्चा सुरु ठेवली आहे. सोमवारी अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडन आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. रशियाला युपेनवर हल्ला करण्यापासून रोखण्यासाठी कशा प्रकारे सामोपचाराच्या मार्गाने राजी करता येईल यावर दोन्ही नेत्यांनी खल केला अशी माहिती देण्यात आली. तसेच रशियाने आपल्या सैन्याच्या साहाय्याने युपेनला घातलेल्या वेढय़ाचे आव्हान कसे पेलता येईल, याचे धोरणही दोन्ही नेत्यांनी ठरविले असे स्पष्ट करण्यात आले.
ब्रिटनचेही प्रयत्न
पूर्व युरोपात सातत्याने वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर युरोपातील इतर देशही सक्रीय झाले आहेत. बिटनने अन्य काही देशांच्या साहाय्याने तणाव कमी करण्याच्या दिशेने प्रयत्न चालविले आहेत. गेल्या आठवडय़ात पुतीन यांनी आपल्या सैन्याला युक्रेनवर आक्रमण करण्याचा आदेश दिला होता, अशी युरोपियन देशांची माहिती आहे. तथापि अमेरिकेने याला दुजोरा दिला नाही. त्यामुळे रशियाचे नेमके धोरण काय याविषयी अद्यापही साशंकता व्यक्त केली जात आहे.
फुटीरतावाद्यांचा उच्छाद
रशियाने युक्रेनवर प्रत्यक्ष हल्ला न करता त्या देशातील फुटीरतावाद्यांना साहाय्यता देण्याचे धोरण आखले आहे. युक्रेन आतून खिळखिळा करण्याची ही योजना आहे. मात्र, त्यालाही अधिकृत दुजोरा मिळत नाही. गेल्या काही दिवसांमध्ये फुटीरतावाद्यांनीच त्या देशात हिंसाचार माजविण्यास प्रारंभ केला.
बॉक्स
युपेनचे पाच सैनिक ठार
रविवारी अचानकपणे रशियाने युपेनच्या पाच सैनिकांवर गोळीबार करुन पाच जणांना मृत्यूमुखी पाडले असे वृत्त पसरले आहे. मात्र या वृत्ताला अद्याप रशिया किंवा अमेरिका यांनी दुजोरा दिलेला नाही. मात्र या वृत्तामुळे युरोपात तणावर तीव्रपणे वाढला आहे. आता युद्धालाच प्रारंभ होईल, अशा चिंतेपोटी लोक आपल्या सुरक्षेची आणि अन्नाची व्यवस्था करुन ठेवत आहेत, असेही वृत्त आहे. एका विद्रोही गटाला युपेनमध्ये घुसविण्याचा रशियाचा प्रयत्न होता. मात्र तो हाणून पाडण्यात आला. लोक गटागटाने सार्वजनिक स्थानी युरोपच्या भवितव्याविषयी चर्चा करत असल्याचे दिसून येते. अशी स्थिती दुसऱया महायुद्धानंतर प्रथमच निर्माण झाली आहे. अशी अनुभवी आणि जुन्या लोकांची प्रतिक्रिया आहे. एकंदर, रशियातून सध्या परस्परविरोधी संकेत मिळत असल्याने निश्चित काय होणार किंवा स्थिती कसे वळण घेणार यासंबंधी मोठी साशंकता निर्माण झाली आहे.