निर्णयप्रक्रियेत युवांना अवश्य सामील करा
बहुप्रतीक्षित चित्रपट ‘पृथ्वीराज’मध्ये सुपरस्टार अक्षय कुमारची नायिका म्हणून माजी विश्वसुंदरी मानुषी छिल्लर म्हणून झळकणार आहे. मानुषीचा हा बॉलिवूडमधील पदार्पणाचा चित्रपट असणार आहे. युनिसेफने मानुषीला तरुणाईसाठीची एक मोहीम चालविण्याची जबाबदारी दिली आहे. भविष्यातील भारताची कल्पना करणारी ही मोहीम आहे. तरुणाई ही निखाऱयाप्रमाणे असून जी दिव्यांना प्रज्वलित करू शकते. आम्हीच भविष्य असून आम्ही जे काही आज पेरू, भविष्यात त्यापासून भरपूर काही प्राप्त करू शकतो. भारतात 30 कोटींहून अधिक युवा आहेत. त्यांना कामासाठी विदेशात पाठविणे आणि त्यांना याचकरता नागरिकत्व प्राप्त करण्यायोग्य केल्यास भारताच्या प्रगतीची शक्यता प्रचंड वाढणार असल्याचे मानुषीने ‘युवाह’ या पुढाकाराबद्दल बोलताना सांगितले आहे.

युवांना सक्रीय स्वरुपात जोडून भारताचा कायापालट करविणारे महत्त्वपूर्ण लक्ष्य प्राप्त करण्याचा रोडमॅप मानुषीने सादर केला आहे. मानुषीचा ‘पृथ्वीराज’ हा चित्रपट 21 जानेवारी रोजी जगभरात झळकणार आहे.