ऑनलाईन टीम / लखनऊ :
लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे असलेल्या उत्तर प्रदेशात कोरोनाने अक्षरशः हाहाकार माजविला आहे. मागील 24 तासात 34,379 नवे रुग्ण आढळून आले. तर 195 जणांचा मृत्यू झाला आहे. तर प्रदेशातील एकूण रुग्णांचा आकडा 2,59,810 वर पोहोचला आहे.

यापूर्वी बुधवारी 33,214 रुग्णांची नोंद झाली होती. आरोग्य विभागाचे एसीएस अमित मोहन प्रसाद यांनी सांगितले की, काल दिवसभरात 16,514 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर 1,96,889 रुग्णांची तपासणी करण्यात आली. प्रदेशात आतापर्यंत 10 हजार 541 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दरम्यान, राजधानी लखनऊमध्ये देखील भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील 24 तासात 5,014 नवे रुग्ण आढळून आले. तर 3,590 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले. तर 19 जणांचा मृत्यू झाला आहे.