प्रतिनिधी /बेंगळुर
देशभरात कोरोनाचा फैलाव सुरूच असल्याने देशभरातील मंदिर, मशिद, तसेच चर्च बंद आहेत. त्यामुळे सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे कोरोनामुळे बंदच आहेत. असे असतानाच कर्नाटकात येडियुराप्पा सरकारने मोठा निर्णय घेत सर्वांनाच धक्का दिला. त्यांनी मंगळवार दि. 27 रोजी मंदिर, मशिद, तसेच चर्च सुरू करणार असल्याची घोषणा केली. या निर्णयानंतर त्यांनी अवघ्या काही तासांमध्येच कलटी मारत निर्णय फिरवला आहे. त्यांनी आता मंदिर, मशिद तसेच चर्च सुरू करणार नसल्याचे म्हटले आहे. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाची वाट पाहणार असल्याचे त्यांनी निर्णयावरून कलटी मारताना सांगितले. मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
Trending
- शहराच्या विविध भागात उद्या वीजपुरवठा खंडित
- विमानसेवेनंतर आता रेल्वेसेवाही पळविली!
- गैरव्यवहारातील संबंधितांवर कारवाई करा
- चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक कलंडला
- भुतरामहट्टीतील वाघाच्या प्रकृतीत सुधारणा
- संकेश्वरच्या शिवभक्ताचा रायगडावर मृत्यू
- कंग्राळी बुद्रुक-यमनापूर मेन रस्त्यावर खड्यांचे साम्राज्य
- तालुक्यात शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात