प्रतिनिधी/ बेळगाव
येळ्ळूर येथील नवहिंद को-ऑप. सोसायटीची सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. प्रियदर्शिनी नवहिंद महिला को-ऑप. सोसायटीच्या सावित्रीबाई फुले सभागृहात 28 वी सभा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन उदय जाधव होते.
सोसायटीला 72 लाख 55 हजार रुपये नफा झाला आहे. सभासदांना 14 टक्के लाभांश देण्याचे सभेमध्ये जाहीर करण्यात आले. सोसायटीकडे 247 कोटींचे खेळते भांडवल आहे. 40 कोटी 41 लाख रुपये गुंतवणूक आहे. सोसायटीकडे 233 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. 189 कोटी रुपयांची कर्जे दिली आहेत. नवहिंद क्रीडा केंद्राचे संस्थापक वाय. बी. चौगुले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सभेला सुरुवात झाली.
माजी संचालक आनंद पाटील यांनी ईशस्तवन म्हटले. सभेच्या वृत्तांताचे वाचन जे. बी. शहापूरकर यांनी केले. ताळेबंद पत्रकाचे वाचन येळ्ळूर शाखेचे व्यवस्थापक एम. एम. पाटील यांनी केले. नफा-तोटा पत्रकाचे वाचन एस. के. बामणे यांनी केले. नफा विभागणीचे वाचन निलेश नाईक यांनी केले. अंदाजपत्रकाचे वाचन दिनेश पाटील यांनी केले. पोटनियम दुरुस्तीचे वाचन साहाय्यक व्यवस्थापक एन. डी. वेर्णेकर यांनी केले.
यावेळी मल्टिपर्पज सोसायटीचे संचालक दत्ता उघाडे, पी. ए. पाटील, आनंद पाटील यांनी आपले विचार मांडले. सूत्रसंचालन संचालक अनिल हुंदरे यांनी केले. संचालक प्रकाश अष्टेकर यांनी आभार मानले. यावेळी प्रियदर्शिनी नवहिंद सोसायटीच्या चेअरपर्सन वैशाली मजुकर, नवहिंद मल्टिपर्पज सोसायटीचे चेअरमन वाय. सी. गोरल, महिला प्रबोधन संघाच्या अध्यक्षा शुभांगी पाटील, व्हा. चेअरमन संभाजी कणबरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी पी. एस. मुरकुटे, एल. आय. पाटील, सी. बी. पाटील, एस. वाय. चौगुले, नीता जाधव, बी. आर. पुण्याण्णवर, व्ही. टी. बिर्जे, चंद्रकांत घाडी, शांताराम कुगजी, पंकज जाधव, नारायण बस्तवाडकर, आनंद मजुकर, दशरथ पाटील, परशराम कंग्राळकर, नारायण जाधव, प्रमोद जाधव यांच्यासह सोसायटीचे पदाधिकारी, भागधारक आदी उपस्थित होते.