प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाच्या संकटामुळे यंदाचा सहावा आंतरराष्ट्रीय योग दिन सार्वजनिकरीत्या रद्द करण्यात आला असून ऑनलाईनद्वारे साजरा करण्याचा निश्चय करण्यात आला आहे. त्यानुसार रविवार दि. 21 रोजी सकाळी 6 ते 7 या वेळेत फेसबुक ऑनलाईनद्वारे प्रसारण करण्यात येणार आहे. योगमहर्षी बाबा रामदेव यावेळी मार्गदर्शन करणार असून योग साधकांनी श्री भंवरलाल आर्य या नावाने फेसबुक ओपन करावे व आपल्या घरातच योग दिन साजरा करावा, असे येथील पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान ट्रस्ट बेळगाव यांच्यावतीने कळविण्यात आले आहे.