सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुकमध्ये दक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचे नाव नोंदले गेले आहे. अभिनयातून जेवढं त्यांनी नाव कमवलं त्याहून कित्येक पटीने त्यांनी लोकांची मदत करून नाव कमावलं. त्यांच्या याच गुणामुळे तमिळनाडूतील लोकांनी त्यांना देवाचा दर्जा दिला असून त्यांचा वाढदिवस हा तिथे एखादा उत्सव म्हणून साजरा केला जातो. केवळ दक्षिणेतच नाही तर उत्तर भारतासह जगभर रजनीकांत यांचे लाखो-करोडो चाहते आहेत. 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शिवाजी द बॉस’ या तमिळ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल 26 कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत यांनी मद्रास आणि बंगळूरमध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळी कामे केली आहेत. ते बंगळूर बस ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसमध्ये कंडक्टर (वाहक) म्हणून नियुक्त झाले होते. कंडक्टर असताना त्यांची तोंडाने शिट्टी वाजविण्याची कला लोकप्रिय झाली होती. सध्या असलेली लोकप्रियता पाहूनच त्यांची नोंद गिनिज बुकमध्ये केली आहे.
संकलन – अनुराधा कदम