प्रतिनिधी / खेड
तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील घरडा कंपनीतील स्फोटात तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये तीन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. कंपनीत आणखी काही कामगार अडकल्याची भीती वर्तविण्यात येत असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. ८ हून अधिक रुग्णवाहिका मदतकार्यात गुंतल्या आहेत. स्फोटाचे नेमके कारण समजू शकले नाही.
