प्रतिनिधी/ खेड
मार्च महिन्यापासून थैमान घालणाऱ्या कोरोनाने आतापर्यंत तालुक्यातील ५१ जणांचा बळी घेतला आहे. यामुळे बळींचे अर्धशतक पूर्ण झाले आहे. बुधवारी रात्री प्राप्त अहवालानुसार कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह दोघांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. नव्या रूग्णांमुळे कोरोनाबाधितांची संख्या ११५० वर पोहचली आहे. तालुक्यात झपाट्याने वाढणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांमुळे प्रशासकीय यंत्रणांसह ग्रामस्थांची चिंता कायम आहे.
मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अलसुरे येथील ५२ वर्षीय प्रौढाचा कोरोनाने पहिला बळी गेल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. यानंतर एकामागोमाग एक कोरोना बळींची संख्या झपाट्याने वाढत गेली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यावर भर दिला. मात्र, यंत्रणांच्या साऱ्या प्रयत्नांवर पाणीच फेरून कोरोनाबाधितांची संख्या वाढतच राहिली.
एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना कोरोनाबळींच्या वाढत्या संख्येने प्रशासनासह ग्रामस्थांची चिंता वाढतच राहिली. सद्यस्थितीत कोरोना बळींची संख्या ५१ वर पोहचली आहे. दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढतच आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत ९ ४६ जणांनी कोरोनावर केलेली मात हीच प्रशासनासाठी दिलासादायक बाब ठरली आहे.
Previous Articleमाझे कुटुंब सर्वेक्षणास आशांचा नकार
Next Article सावधान ऑनलाईन मुले शिकत आहेत
Related Posts
Add A Comment