प्रतिनिधी/खेड
खेड नगरपरिषद हद्दीतील जे २७ खोकेधारक भुईभाडे थकीत आहेत ते आमचे स्थानिक रहिवाशी असून याच व्यवसायावर त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत आहे. त्यांचा हा व्यवसाय कायमस्वरूपी चालावा, हीच भावना असून शहरातील खोके व्यावसायिकांची विरोधकांनी चिंता करू नये, असा पलटवार करत शिवसेना नगरसेवकांनीच खोकेधारकांचा कोणताही विचार न करता बहुमताच्या जोरावर वसुली मुदतवाढीचा ठराव फेटाळल्याचा आरोप मनसेचे नगरसेवक विश्वास मुधोळे यांनी पत्रकाद्वारे केला आहे.
नगरपरिषद हद्दीतील खोक्यांच्या थकीत भुईभाड्याचा विषय सर्वसाधारण सभेत का वगळला? या सेनेच्या आरोपांचे खंडन करत नगरपरिषद जनतेला सर्व सुविधा सक्षमपणे पुरवत असून प्रसंगी इतर माध्यमातून व सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून जनतेची सेवा करत आहे. याचे प्रत्यंतर गेले सहा महिने कोरोना महामारीच्या काळात येथील जनतेला आले आहे. खोकेधारकांकडून ३ वर्षे भुईभाडे वसुली केली नसल्याने आर्थिक नुकसान होत असल्याचे निवेदन दिले आहे.
मात्र, खोकेधारकांना मुदतवाढ मिळत नाही. हे म्हणणे पुर्णत: जनतेची दिशाभूल करणारे आहे. धोकेधारकांची करवसुली व मुदतवाढ मिळावी म्हणून २०१७ ते २०१९ याकालावधीत नगरपरिषदेच्या ५ सर्वसाधारण सभा झाल्या. या सभांमध्ये शिवसेना नारसेवकांनी खीकेधारकांचा कोणाताही विचार न करता त्यांना मुदतवाढ मिळू नये, म्हणून ठरावाला विरोध करत बहुमताच्या जोरावर ठराव फेटाकल्याने नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान झाले आहे. याला जबाबदार कोण? असा प्रश्नही उपस्थित केला आहे.
Previous Articleमोहूं न शकती त्या घननीळा
Next Article दानं दारिद्रय़स्य…..(सुवचने)
Related Posts
Add A Comment