प्रतिनिधी/रत्नागिरी
जिह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने कमी होत असल्याचे चित्र आहे. आज, रविवारी आलेल्या अहवालानुसार जिह्यात केवळ 17 पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचे आढळून आले आहे. तर उपचाराखाली असलेल्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू संख्या 304 वर पोचली आहे.
दरम्यान जिह्यात कोरोना बाधितांची संख्या खालावत असली तरी रविवारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयातील एका डॉक्टरचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्या डॉक्टरच्या संपर्कात आल्याने डॉ. फुले या विलीगिकरणात होत्या. त्यांचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला.
आज, पॉझिटिव्ह आलेल्या 17 अहवालांमध्ये 8 जण आरटिपीसीआर टेस्ट केलेले तर 9 जण अँटिजेन केलेले आहेत. नव्या 17 रुग्णांमुळे एकूण रुग्णसंख्या 8 हजार 213 झाली आहे. तर, तब्बल 224 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आता पर्यंत 45 हजार 670 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान आज तब्बल 115 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आता पर्यंत 7 हजार 542 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील काही दिवसात जिह्याचा कोरोना रिकव्हरी रेट 91.83 टक्क्यांवर पोचला आहे. मागील 24 तासात दोघांचा मृत्यू झाला आहे. आता पर्यंत 304 जणांचा मृत्यू झाला आहे. जिह्याचा मृत्यूदर 3.70 टक्के आहे.
Previous Articleसातारा : फत्त्यापुरात युवकाची दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या
Next Article सातारा : अपघातावरून दुचाकी चालकावर गुन्हा दाखल
Related Posts
Add A Comment