वार्ताहर / मौजेदापोली
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे शासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून दापोली नगरपंचायतीकडून शहरात विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर 500 रूपयांचा दंड आकारण्यास सुरूवात केली आहे. ही कारवाई सध्या अशीच सुरू राहणार असल्याचे दानपंच्या अधिकाऱ्यांनी चौकशी दरम्यान सांगितले. सोमवारीच या पथकाने 6 जणांवर दंडात्मक कारवाई केली.
महाराष्ट्रात कोरोनाच्या संकटात पुन्हा कोरोनाचे संकट वाढत असून रत्नागिरी जिल्ह्यात देखील मोठ्या संख्येने रूग्ण वाढ होत आहे. तसेच पुन्हा एकदा दापोलीत रूग्ण सापडून आल्याने दापोलीकर चिंतेत आहेत. असे असले तरी मात्र अजूनही याचे गांभिर्य अनेकांना समजले नसल्यामुळे अनेकजण विना मास्क फिरत आहेत. मात्र दापोली नगरपंचायत, महसूल विभाग, पोलीस यांच्या पथकाने दंडात्मक कारवाई करण्यास सुरूवात केल्यामुळे दापोलीत अनेकांनी मास्क वापरण्यास सुरवात केली.
काहीतर गावातून येताना मास्क आणले नव्हते. त्यांनी दुकानात जावून 500 रूपये भरण्यापेक्षा 20 रूपयाचा मास्क घेणे पसंत केल्याचे चित्र पहायला मिळाले. मात्र ज्यांच्याकडे मास्क नाहीत अशा व्यक्तींकडून मात्र 500 रू. दंड आकारण्यात आला. दापोली नगरपंचायतीकडून एक दिवस ही कारवाई केली जाते. तर त्यानंतर पुन्हा ही कारवाई थंडावत असल्यामुळे अनेकांनी वेळोवेळी नाराजी देखील व्यक्ती केली आहे.
मात्र पुन्हा एकदा कोरोनाची संख्या वाढू लागल्यामुळे ही धडक कारवाई करण्यात येत असल्याचे समोर आले. दापोली नगरपंचायत, महसूलविभाग, पोलीस यांचे एक पथक सोमवारी सकाळपासून दापोली एस. टी. बस स्थानकाच्या परिसरात फिरत होते. ही कारवाई करत असताना अनेकांनी वाद देखील घातले. मात्र तरीही दंडाची पावती फाडून घेण्यात आले. त्यामुळे दापोलीत फिरणाऱया व्यक्तींत्या तोंडाला मास्क दिसून येत होते. दापोली बस स्थानकात जावून या पथकाने तेथील प्रवाशांना मास्क वापरण्याबाबत सूचना दिल्या. त्या आजतागायत अमलात आहेत. मात्र कोरोनो पुन्हा आपले हातपाय पसरण्यास सुरूवात केल्यामुळे दापोलीकर चिंतेत पडले असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
अनेकांमध्ये नाराजी
दापोली नगरपंचायतीकडून 500 रूपये दंड आकारला जात असल्यामुळे खिशात खर्चासाठी ठेवलेले पैसे दंड म्हणून द्यावे लागत आहेत. यामुळे दापोलीत येणारे नागरीक नाराजी व्यक्त करतात. तसेच ही कारवाई कायम ठेवा म्हणजे झालं असे देखील ते बोलले जात आहे.