प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने यांचे स्पष्टीकरण
प्रतिनिधी / खेड
तालुक्यातील पोसरे दरड दुर्घटनेतील मृतांच्या वारसांची बँक खात्यासंदर्भातील सर्व कागदपत्रे मातीच्या ढिगाऱ्याखाली जाऊन गहाळ झाली आहेत. यामुळे त्यांच्या वारसांना पैसे मिळणे सोयीचे व्हावे याकरिता धनादेश परत घेतले होते. 8 जणांची खाती शोधून वारसांची तपासणी केल्यानंतर विभागून ही रक्कम देण्यात आल्याचेही पांताधिकारी अविशकुमार सोनोने यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
पोसरे-बौद्धवाडी येथील 7 घरांवर दरड कोसळून 17 जण मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. यातील 16 जणांचे मृतदेह हाती लागले, तर एका वृद्धेचा मृतदेह सापडलेला नाही. या दरड दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना पालकमंत्री अनिल परब यांच्याहस्ते प्रत्येकी 4 लाख रूपयांच्या मदतीचे धनादेश देण्यात आले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी हे धनादेश परत घेत वारसांच्या कुटुंबियांची चेष्टा केल्याचा आरोप बसपाचे पदेश सचिव राजेंद्र आयरे यांनी केला होता. तसे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांना दिले होते.