प्रतिनिधी / राजापूर
दोन दिवसांपूर्वी राजापूर तालुक्यातील माडबन मिठगवाणे परिसरातील सड्यावर गुरे चारविण्यासाठी गेलेल्या एका ग्रामस्थाला बॉम्ब सदृश्य गोष्ट आढळून आली आहे. त्याने याबाबत आपल्या गावच्या पोलीस पाटलांना तात्काळ खबर दिली. पोलीस पाटलांनी सागरी पोलीस ठाणे नाटेला तात्काळ संपर्क करीत या गोष्टीची माहिती दिली. नाटे सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील, पोलीस कर्मचारी विकास चव्हाण, फणसेकर, दिनेश कांबळे दीपक काळे व अन्य यांच्यासहित तात्काळ माडबन मिठगवाणेकडे रवाना झाले. हे करीत असताना त्यांनी रत्नागिरी येथील बॉम्ब शोधक व बॉम्ब नाशक पथकाला याबाबत माहिती दिली.
दिनांक 29 जुलै 2021 च्या सकाळी ही घटना निदर्शनास आल्यानंतर नाटे पोलीसानी श्वानपथक व बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाच्या मदतीने या ठिकाणी सापडलेल्या गावठी बॉम्ब ताब्यात घेतला तो गावठी बॉम्ब असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी या परिसरात अजूनही काही गावठी बॉम्ब आहेत का याचा शोध घेण्यासाठी दिवसभर संपूर्ण परिसर पिंजून काढला. सदर प्रकारचा गावठी बॉम्ब हा शिकारीसाठी वापरण्यात जात असल्याचे सांगण्यात आले आहे. तर हा गावठी बॉम्ब सापडण्यापूर्वी पुर्वी दोन दिवस आधी या भागात शिकार झाल्याची कुजबूज परिसरात ऐकू येत आहे.
दोनच महिन्यापूर्वी नाटे पोलिसांनी शिकारीसाठी जात असलेल्या काही जणांना मुद्देमालासह पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.
आता या परिसरात शिकारीसाठी वापरण्यात येणारा गावठी बॉम्ब सापडल्याने पोलीसअधिक सतर्कपणे आणि कसून याचा तपास करीत आहेत. वन्य प्राण्यांची शिकार करणे आणि त्यासाठी अशाप्रकारे गावठी बॉम्ब वापर होणे गंभीर असून जोशींचा शोध लावून त्यांच्यावर खडक कारवाई होणार असल्याचे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहेत.
यासंदर्भात नाटे पोलिसांनी अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल केला असून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहित कुमार गर्ग उपविभागीय अधिकारी साळोखे व अन्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आबासाहेब पाटील अधिक तपास करीत आहेत.