प्रतिनिधी / संगमेश्वर
संगमेश्वर तालुक्यातील फूणगुस, माखजन, संगमेश्वर बाजारपेठेत पुराचे पाणी घुसले असून दुकाने आणि घरांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे.

सोमवारी रात्री पासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सोनवी बावनदी असावी आणि शास्त्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून लगतच्या बाजारपेठातून पाणी घुसू लागले आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर बाजारपेठेतील दुकानांचे आणि घरांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.