मशिदी मुस्लिमांसाठी पवित्र आणि प्रार्थनेची जागा असतात. येथे सर्व मुस्लीम मिळून नमाज अदा करतात. जगातील अनेक मशिदी इस्लामी संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतात, या सुंदर मशिदी इस्लामिक धर्मस्थळ असूनही स्वतःची स्थापत्यकलेमुळे अत्यंत विशेष मानल्या जातात.
मस्जिद-ए-नबवी

काबा शरीफनंतर मस्जिद नबवी मुस्लिमांसाठी सर्वात महत्त्वाचे आणि पवित्र स्थान आहे. मशिदीच्या भिंती दगड अणि विटांनी तर छत लाकडाने तयार करण्यात आले आहे.
निळी मशिद

तुर्कस्तानचे शहर इस्तंबूलला सुंदर मशिदींचे शहर देखील म्हटले जाते. येथे निळी मशिद असून यातील 6 मिनारे सुयांप्रमाणे दिसतात. मशिदीची निर्मिती 1609 आणि 1616 दरम्यान ओटोमन शासक अहमद प्रथमने केली होती. मशिदीच्या चहुबाजूला निळय़ा टाइल्स असल्यानेच याला निळी मशिद नाव देण्यात आले आहे.
शेख जायद मशिद

संयुक्त अरब अमिरातमधील या मशिदीचे सौंदर्य याला अधिकच विशेष ठरविते. या मशिदीत 82 गुंबदांची निर्मिती करण्यात आले आहे. तर मशिदीला सोनेरी झुमरने सजविण्यात आले आहे. या मशिदीत जगातील सर्वात मोठी हस्तनिर्मित कालीन (गालिचा) आहे. तर मुख्य हॉलमध्ये जगातील सर्वात मोठा झुमर लावण्यात आला आहे. याचबरोबर परिसरात अनेक सुंदर तलाव आहेत.
जामा मशिद
मस्जिद जहांनुमाच जामा मशिदीच्या नावाने प्रख्यात आहे. ही राजधानी दिल्लीतील सर्वात महत्त्वपूर्ण मशीद आहे. याची निर्मिती मुगल सम्राट शाहजहांने केली होती. 1656 मध्ये याची निर्मिती झाली होती. ही भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात प्रसिद्ध मशिदींपैकी एक आहे.
मुहम्मद अली मशीद
मुहम्मद अली मशीद इजिप्तची राजधानी कैरोमध्ये आहे. ही कैरोमधील सर्वात प्रमुख मशिदींपैकी एक आहे. शहरात येणारे पर्यटक या मशिदीलाच प्रथम भेट देतात. या मशिदीची निर्मिती 1830-1848 दरम्यान झाली आहे.