प्रतिनिधी / कोल्हापूर
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांची कोल्हापूर महापालिकेच्या उपायुक्तपदी नियुक्ती झाली आहे. आडसूळ यांनी बुधवारी स्वीकारला पदभार.
आडसूळ हे मूळचे कोल्हापूर निगवे येथील आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषदमध्ये सामान्य प्रशासन विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ही त्यांनी काम केले होते.तसेच सांगली जिल्ह्यातील पलूस येथे त्यांनी गटविकास अधिकारी म्हणून काम केले आहे. त्यानंतर सांगली जिल्हा परिषदेत ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे.
यानंतर त्यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेत आपल्या कामातून वेगळी छाप पाडली होती.‘दिव्यांग उन्नती अभियान’राबवण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली यावेळी जिल्ह्यातील दिव्यांगांचा सर्व्हे झाल्याने या अभियानचे कौतुकही झाले होते. चार महिन्यापूर्वी त्यांची बदली झाली होती.आणि आता ते कोल्हापूर मनपा उपायुक्तपदी नियुक्त झाले आहेत.