बेळगाव शहरातील 147 जणांचा समावेश : रविवारी सक्रिय रुग्णसंख्या दोन हजार पार
प्रतिनिधी / बेळगाव
रविवारी बेळगाव शहर व जिल्हय़ातील 319 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये एका बेळगाव शहरातील 147 जणांचा समावेश असून एकूण बाधितांची संख्या 31 हजाराच्या उंबरठय़ावर आली आहे. अद्याप 13 हजार 079 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल यायचे आहेत.
उपलब्ध माहितीनुसार बेळगाव शहर व उपनगरात रुग्णसंख्या वाढती आहे. 147 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून गोकाक तालुक्मयातील 52, अथणी तालुक्मयातील 26, सौंदत्ती तालुक्मयातील 11, रामदुर्ग तालुक्मयातील 9, चिकोडी तालुक्मयातील 12 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंतचा बाधितांचा आकडा 30 हजार 777 वर पोहोचला असून त्यापैकी 28 हजार 117 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
जिल्हा सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार सक्रिय रुग्णांच्या संख्येने रविवारी 2 हजारचा आकडा पार केला आहे. 2 हजार 069 सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी बहुतेक जणांवर घरीच उपचार करण्यात येत आहेत. लक्षणे असणाऱया रुग्णांवर वेगवेगळय़ा इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. अद्याप 47 हजार 885 जण चौदा दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत.
स्वॅब तपासणीसंख्या वाढविणार
वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन आयसीएमआर व बिम्समध्ये तपासणीची क्षमता वाढविण्याची सूचना प्रादेशिक आयुक्तांनी दिली आहे. सध्या या दोन्ही प्रयोगशाळेत प्रतिदिन 3 हजार स्वॅब तपासणी केली जाते. ही संख्या दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. क्षमता वाढली तरच स्वॅब तपासणीचा वेग वाढणार आहे. 13 हजारहून अधिक जणांचे अहवाल अद्याप यायचे आहेत.
बाळेकुंद्री, गणेशपूर, कंग्राळी खुर्द, काकती, कंग्राळी बी. के., बसरीकट्टी, निलजी, मोदगा, विजयनगर, अनगोळ, अनसूरकर गल्ली, उद्यमबाग, उज्ज्वलनगर, विश्वेश्वरय्यानगर, वैभवनगर, वडगाव, विजयनगर, न्यू गुड्सशेड रोड, खासबाग, खादरवाडी, किर्लोस्कर रोड, कुमारस्वामी लेआऊट, कुवेंपूनगर, माळमारुती, मृत्युंजयनगर, वीरभद्रनगर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
बाधितांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ
अशोकनगर, ऑटोनगर, रामतीर्थनगर, अयोध्यानगर, कॅम्प, चिदंबरनगर, गांधीनगर, गणेशनगर, गोवावेस, हनुमाननगर, हिंदवाडी, पार्वतीनगर, राणी चन्नम्मानगर, रविवार पेठ, रुक्मिणीनगर, सदाशिवनगर, शास्त्राrनगर, शहापूर, श्रीनगर, टीचर्स कॉलनी, शिवबसवनगर परिसरातही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत असून खासकरून बेळगाव शहर व उपनगरात बाधितांची संख्या झपाटय़ाने वाढती आहे.