एटीएसमधील 72 जणांना कोरोना, 5 जण दगावले, 715 जण झाले कोरोनामुक्त
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली आहे. रविवारी 424 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून यामध्ये सांबरा एटीएसमधील 72 प्रशिक्षणार्थी जवानांचा समावेश आहे तर कोरोनामुळे जिल्हय़ातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
रविवारी बेळगाव तालुक्मयातील 179 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये शहर व उपनगरांतील 101 व ग्रामीण भागातील 78 जणांचा समावेश आहे. सांबरा एटीएसमधील 72 व बेळगाव-गोवा महामार्गाचे काम करणाऱया 18 कामगारांनाही कोरोनाची लागण झाली आहे. हुक्केरी, रायबाग, बैलहोंगल व बेळगाव येथील एकूण पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
रविवारी सिव्हिल हॉस्पिटलसह जिल्हय़ातील वेगवेगळी इस्पितळे व कोविड केअर सेंटरमधून कोरोनामुक्त झालेल्या 715 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आतापर्यंत 12 हजार 90 हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली असून यापैकी 8 हजार 726 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 3 हजार 180 सक्रिय रुग्णांवर वेगवेगळय़ा इस्पितळांमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
2 हजार 480 अहवालांची प्रतीक्षा
जिल्हय़ातील 28 हजार 367 जण होम केअरमध्ये आहेत. तर वेगवेगळय़ा प्रयोगशाळातून 2 हजार 480 जणांचे अहवाल अद्याप यायचे आहेत. सरकारी माहितीनुसार आतापर्यंत जिल्हय़ातील 184 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षात हा आकडा अनेकपटीने अधिक आहे.
मण्णीकेरी, कडोली, मंडोळी, राकसकोप, कंग्राळी बी. के., पंतबाळेकुंद्री, सांबरा, मुतगा, हलगा, मण्णूर, काकती, नेहरूनगर, हनुमाननगर, गणेशपूर, भाग्यनगर, बिम्स क्वॉर्टर्स, गुड्सशेड रोड, राणी चन्नम्मानगर, आझमनगर, वडगाव, काकतीवेस, महावीरनगर, सदाशिवनगर, कावेरीनगर, खासबाग, मंगाईनगर-वडगाव, पी. के. क्वॉर्टर्स, संभाजीनगर-वडगाव, शास्त्राrनगर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
गुरुप्रसाद कॉलनी, टिळकवाडी, अनगोळ, अशोकनगर, शिवाजीनगर, फुलबाग गल्ली परिसरातही रविवारी नवे रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाने स्वॅब तपासणी वाढविली आहे. त्यामुळे साहजिकच पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही वाढती आहे. राज्य आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटिनमधील बाधितांचा आकडा मात्र 357 इतका आहे.
खासगी डॉक्टर व बिम्समधील वैद्यकीय कर्मचाऱयांना कोरोनाची लागण
खासगी डॉक्टर व बिम्समधील वैद्यकीय कर्मचाऱयांना कोरोनाची लागण सुरूच आहे. बेळगाव शहर व उपनगरांबरोबरच ग्रामीण भागातही बाधितांची संख्या वाढती आहे. सांबरा एअरफोर्समध्ये प्रशिक्षणासाठी नव्याने दाखल झालेल्या 72 तरुणांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.