दुबई : एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या दुबई खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत रशियाच्या द्वितीय मानांकित आंद्रे रूबलेव्हने एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठताना अमेरिकेच्या फ्रिट्जचा पराभव केला. 2021 च्या टेनिस हंगामातील रूबलेव्हचा हा 15 वा विजयी सामना आहे. एटीपीच्या 500 दर्जाच्या स्पर्धांमध्ये रूबलेव्हने सलग 22 सामने जिंकले आहेत. यापूर्वी स्वीसच्या फेडररने 2014 ते 2016 या कालावधीत एटीपी 500 दर्जाच्या स्पर्धामध्ये सलग 28 सामने जिंकण्याचा विक्रम केला आहे. बुधवारी झालेल्या सामन्यात 23 वर्षीय रूबलेव्हने फ्रिट्जचा 6-3, 6-1 अशा सेट्समध्ये पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. दुसऱया एका सामन्यात इटलीच्या सिनरने स्पेनच्या ऍग्युटचा 6-4, 3-6, 7-5 अशा सेट्समध्ये पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले.
Previous Articleवर्षभरात महामार्ग टोलनाकामुक्त!
Next Article आंदोलक शेतकऱयांना लसीकरण करा : टिकैत
Related Posts
Add A Comment