ऑनलाईन टीम/तरुण भारत
गेल्या महिन्याभरापासून रशिया युक्रेमध्ये युद्ध सुरूच आहे. रशियाने युक्रेनच्या अनेक शहरांची मोठी हानी केली आहे. युक्रेनमधील लाखो नागरिक देश सोडून गेले आहेत. युक्रेनच्या अनेक भागांमध्ये रशियन फौजांचे हल्ले अजूनही सुरूच आहेत. रशियावर यानेच देशांनी बहिष्कार टाकला आहे. तर अमेरिका सारखे बलाढ्य देश रशियावर दबाव आंत आहेत. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर युक्रेन आणि रशिया या दोघांनाही काही देशांकडून समर्थन मिळत आहे.
दरम्यान, युक्रेनच्या बाजूने आता नाटो, अमेरिका आणि इतरही अनेक युरोपीयन देश उभे राहिले असताना युद्ध अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर रशिाला कोंडीत पकडण्याची तयारी इतर देशांनी केलेली आहे. त्यात आता चीनकडून रशियाच्या समर्थनार्थ भूमिका घेतली जाऊ लागली आहे. त्यामुळे आता थेट अमेरिकेने चीनला गंभीर इशारा दिला आहे.
अमेरिकेने रशियाच्या आक्रमक वृत्तीला आळा घालण्यासाठी कठोर पावलं उचलायला सुरुवात केली असून त्याचाच एक भाग म्हणून चीनला बायडेन यांनी स्पष्ट शब्दांत ठणकावलं आहे. “मला वाटतं चीनला हे माहिती आहे की त्यांचे आर्थिक हितसंबंध हे रशियापेक्षाही जास्त प्रमाणात पाश्चात्य देशांशी जोडले गेले आहेत. त्यामुळे मला आशा आहे की शी जिनपिंग या युद्धात चीनला सहभागी करणार नाहीत. चीननं या बैठकीमध्ये पाश्चात्य देशांशी असलेले संबंध वृद्धींगत करण्याचा देखील मानस बोलून दाखवला आहे”, असं देखील बायडेन यांनी यावेळी नमूद केलं.
