प्रतिनिधी / मिरज
मिरज शहरातील शिवाजी रोडवरील बहुचर्चित ट्रीमिक्स रस्त्याच्या कामाचे केवळ उदघाटन झाले, पण आजतागायत कामाला प्रारंभ झाला नाही. ठेकेदार चालढकल करीत असल्याने महापालिकेच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात होती. त्यामुळे महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी याप्रकरणी लक्ष घातले आहे. नगर अभियंता, शाखा अभियंता आणि संबंधित ठेकेदाराला आयुक्तांच्या सहीचे पत्र पाठविण्यात आले आहे. त्यानुसार रस्त्याचे काम तात्काळ सुरू न झाल्यास ठेकेदाराला दररोज 10 हजारांचा दंड भरावा लागणार आहे. तसेच नगर अभियंत्यांना 250 रुपये आणि शाखा अभियंत्यांना 500 रुपयांचा दंड केला जाणार आहे. आयुक्तांच्या इशारा वजा नोटीसीचा धसका घेऊन तरी प्रत्यक्षात कामाला सुरुवात होते का? हे आता पाहावे लागेल.