ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तसेच त्यांना व्हॉट्सॲपवर शिवीगाळ आणि अश्लील व्हिडीओ पाठवून खंडणीही मागण्यात आली आहे.
भाकियूचे गाझियाबाद जिल्हा प्रभारी जयकुमार मलिक यांच्या वतीने कौशांबी पोलीस ठाण्यातयासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, भाकियूचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांच्या मोबाईलवर वेगवेगळ्या नंबरवरून धमकीचे फोन येत आहेत. त्याचबरोबर व्हॉट्सॲपवर शिवीगाळ आणि अश्लील व्हिडिओ पाठवले जात आहेत. त्याकडे टिकैत दुर्लक्ष करत आहेत. मात्र, त्यांना सतत फोन आणि जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. तसेच खंडणीही मागितली जात आहे.