प्रतिनिधी / सातारा
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले यांनी नुकतीच भेट घेवून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. राजमातांनी त्यांच्याशी ऐतिहासिक बाबींच्या अनुषंगाने चर्चा केली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनीही राजमातांशी संवाद साधला.
राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे सध्या वय 98 असून त्यांच्या प्रकृतीची चौकशी करुन त्यांच्या ऐतिहासिक बाबींबाबत राजमातांनी आस्थेने विचारपुस केली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी चर्चा केली. यावेळी भाजपा सांस्कृतिक आघाडीचे पंकज चव्हाण हेही उपस्थित होते.