साहित्य : 1 वाटी राजमा, 1 चमचा आलं-हिरवी मिरची पेस्ट, 1 चमचा साखर, चवीपुरते मीठ, तेल आवश्यकतेनुसार, तूप आवश्यकतेनुसार, चिमुटभर खाण्याचा सोडा, 1 चमचा मोहरी, 1 चमचा काळीमिरी पावडर, 1 चमचा लिंबूरस, पाव वाटी चीज खिसलेलं
कृती : राजमा रात्रभर पाण्यात भिजत घालावेत. दुसरे दिवशी निथळून मिक्सरला लावून पातळ पेस्ट बनवून घ्यावी. त्यातच आलं-हिरवी मिरची पेस्ट आणि थोडेसे पाणी घालून मिश्रण बारीक वाटून घ्यावे. तयार मिश्रण बाऊलमध्ये काढून त्यात साखर आणि मीठ मिक्स करून 5 ते 10 मिनिटे झाकूण ठेवावे. आता स्टिमरमध्ये पाणी गरम करण्यास ठेवावे. स्टिमर पात्राला तुपाचा हात लावून त्यात तयार मिश्रण ओतावे. त्यात खाण्याचा सोडा मिक्स करून मिश्रण 12 ते 15 मिनिटे ठेवून वाफवून घ्यावे. गरम पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी टाकून तडतडावी. तयार फोडणी वाफवलेल्या मिश्रणावर पसरवावी. वरुन लिंबूरस, काळीमिरी पावडर आणि खिसलेलं चीज पसरवून त्याच्या वडय़ा पाडाव्यात. तयार ढोकळा सॉससोबत खाण्यास