- कोरोनाचे आकडे लपवल्याचा केला होता आरोप
ऑनलाईन टीम / जयपूर :
राजस्थानमधील जयपूर शहरातील भरतपूर येथील खासदार रंजिता कोली यांच्यावर गुरुवारी रात्री हल्ला झाला असल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितनुसार, रंजिता कोली या काल रात्री उशिराने एका सामूहिक आरोग्य केंद्राचे निरीक्षण करून आपल्या घरी जात होत्या. यावेळी रस्त्यात धरसोनी गावांत काही अज्ञातांनी त्याच्या गाडीवर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या गाडीच्या काचा फुटल्या असून रंजिता कोली या किरकोळ जखमी झाल्या आहेत. या घटनेनंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्या खासदार सर्किट हाऊस मध्ये गेल्या.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी खासदारांनी कोरोनाची आकडेवारी लपवल्याचा आरोप राज्य सरकारवर केला होता. रंजिता कोली यांनी सांगितले की, काल रात्री साडे अकरा वाजता सामूहिक आरोग्य केंद्रातून परतत असताना 5-6 लोक माझ्या गाडीजवळ आले आणि त्यांनी गाडीवर दगड मारण्यास सुरुवात केली. त्या लोकांनी आमच्या गाडीवर हल्ला केला.
या घटनेबाबत खासदार टीमकडून माहिती देताना सांगितले की, हा हल्ला खूप भयंकर होता. या हल्ल्यात खासदार बेशुद्ध पडल्या. लगेचच या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. मात्र, पोलीस 45 मिनिटांनी घटनास्थळी पोहचले. तसेच यावेळी खासदारांनी आरोप लावला आहे की, भरतपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला. मात्र त्यांनी फोन उचलला नाही.
दरम्यान, तीन दिवसांपूर्वीच रंजिता कोली यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना भरतपूर मतदार संघात कोरोनाची आरटी – पीसीआर टेस्ट कमी होत आहेत या मुद्द्यावरून पत्र लिहिले होते. त्यांनी असा आरोप केलेला की, टेस्ट कमी होत असल्याने कोरोनाचे योग आकडे समोर येत नाही आहेत. तसेच यावेळी त्यांनी आपल्या भागात दिवसाला किमान 5000 टेस्ट केल्या जाव्यात अशी मागणी देखील केली होती.