मुंबई
मेटा इंडियाअंतर्गत धोरण विभाग प्रमुख राजीव अगरवाल हे आता सॅमसंगमधील महत्त्वाचे पद सांभाळणार आहेत, असे कळते. सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनीत आगामी काळात ते टेक विभाग प्रमुख पद सांभाळणार आहेत. स्मार्टफोनसह इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात देशासह विदेशात कंपनी यशस्वीरित्या व्यवसाय करते आहे. मेटामधून हल्लीच त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जाते.