सावंतवाडी/प्रतिनिधी-
सध्या राज्यात शाळा, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून सिंधुदुर्गातील शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांनी एकत्र येत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधी निवेदन दिले.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार व भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव तथा प्रभारी भाजपा शैक्षणिक महासंघ मनोज पांगारकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच जिल्ह्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्त, कुलगुरू, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्याधिकारी, विभागीय शिक्षण सहसंचालक, विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, (माध्यमिक), शिक्षणाधिकारी (प्राथमिक) तहसीलदार व संबंधित अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस सुरू करण्यासाठी गुरुवार दि.२० जानेवारी रोजी इशारा-निवेदन ( डेडलाईन) देण्यात आला.