सांगली / प्रतिनिधी
सांगली शहरातील काही खाजगी हॉस्पिटलमधील कोविड केअर सेंटर्सना शुक्रवारी डॉ. विश्वजीत कदम यांनी भेट दिली. डॉ. आशिष मगदूम यांच्या क्रांती कार्डियाक सेंटरला भेट देऊन तेथील कोविड रुग्णांची माहिती घेतली. मेहेता हॉस्पिटलमध्ये डॉ. अजित मेहता यांच्याशी चर्चा केली. तर, वाळवेकर हॉस्पिटलमध्ये डॉ. रवींद्र वाळवेकर यांच्याशी संवाद साधला.
राज्यात होणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हॉस्पिटलची सर्वंकष सुरक्षा चोख ठेवण्याचे आवाहन यावेळी केले. हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या सोयीसुविधा व डॉक्टरांना काम करत असताना येणाऱ्या अडचणी समजावून घेतल्या. हॉस्पिटल मधील काम करत असणाऱ्या सर्व सेवकांची भेटून विचारपूस केली.