ऑनलाईन टीम
राज्यसभेतील सहा रिक्त जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाकडून या पोटनिवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. ४ ऑक्टोबरला ही पोटनिवडणूक होणार आहे. देशातील पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील रिक्त राज्यसभेच्या जागांवर ४ ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. निवडणूक आयोगानुसार, त्याची अधिसूचना १५ सप्टेंबरला जारी केली जाणार आहे.
महाराष्ट्रात काँग्रेस नेते राजीव शंकरराव सातव यांच्या निधनामुळे एका जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. तसेच, मध्य प्रदेशातील थावरचंद गेहलोत यांनी राजीनामा दिल्यानंतर एका जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. शिवाय ६ मे २०२१ रोजी मानस रंजन भुनिया यांच्या राजीनाम्यामुळे पश्चिम बंगालमध्ये एक जागा रिक्त झाली आहे. तर, बिसजित डमरे यांच्या राजीनाम्यानंतर आसाममध्ये एक जागा रिक्त झाली आहे. यामध्ये तामिळनाडूतही दोन जागेवर निवडणूक होणार आहे.
निवडणूक आयोगाच्या मते, तामिळनाडूतील राज्यसभेची जागा या वर्षी ७ मे २०२१ रोजी IADMK नेते केपी मुनुसामी यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झाली. त्यांचा कार्यकाळ २०२६ पर्यंत होता. याशिवाय, तामिळनाडूमधूनच आर. वैथिलिंगम यांच्या राजीनाम्यामुळे राज्यसभेची एक जागा रिक्त झाली आहे, ज्यांचा कार्यकाळ २०२२ पर्यंत होता.
निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार १५ सप्टेंबर रोजी अधिसूचना जारी केली जाईल आणि २२ सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर आहे. ४ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी देखील होणार आहे.
Trending
- Kolhapur News : उचगाव लोकनियुक्त सरपंच मधुकर चव्हाण यांचा जातीचा दाखला वैध
- संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
- दंगल बैठकित छत्रपती शाहू महाराज, बंटी पाटील यांना का डावलंल? केसरकर म्हणाले,अनावधाने…
- panhala News : वळिवाची हुलकावणी ; माळरानावरील वाळली पिके, शेतकरी चिंतेत
- आषाढी वारीच्या पायी दिंडी सोहळ्यासाठी सांगरूळ परिसरातील भाविक रवाना
- कामाची योग्य विभागणी करण्यासाठी कार्याध्यक्षपदाची निर्मिती
- मुंबई गोवा महामार्गावर खासगी बसला अपघात : सुदैवाने सर्व प्रवासी वाचले
- नेत्यांना विश्वासात घेऊन पवार साहेबांनी घोषणा केलीयं, अजितदादा नाराज आहेत असं म्हणणाऱ्यांना रोहित पवारांच स्पष्टचं उत्तर