प्रतिनिधी / बांदा:
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, पुणे यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय गणेश गीत गायन स्पर्धेत सावंतवाडी येथील सद्गुरू संगीत विद्यालयाचे विद्यार्थी श्री नितिन लक्ष्मीकांत धामापूरकर यांनी तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केले. रोख अकरा हजार रुपये, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र तसेच शाल श्रीफळ देऊन पुणे येथील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. खास बाब म्हणजे या स्पर्धेमध्ये राज्यभरातून ५०० पेक्षा जास्त स्पर्धक सहभागी झाले होते. तसेच आयोजकांनी गणेश गीत दिलेले होते. त्या गणेश गीताला चाल लावून स्पर्धेमध्ये गायचे होते. सद्गुरू संगीत विद्यालयाचे संचालक, गुरुवर्य आदरणीय श्री निलेश मेस्त्री यांनी या गणेश गीताला अमृतवर्षीनी या रागामध्ये संगीतबद्ध केले होते.
Previous Articleसुरेश मांजरेकर यांचे निधन
Next Article विजांच्या कडकडासह पावसाने झोडपले
Related Posts
Add A Comment