प्रतिनिधी / बेंगळूर
कर्नाटकात बेकायदेशीरपणे स्थलांतरित झालेल्या बांगलादेशी आणि पाकिस्तानी नागरिकांना हद्दपार केले जाईल, असे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी सांगितले. बेंगळुरात पत्रकारांशी ते बोलत होते. संबंधित अधिकाऱयांना राज्यात बेकायदेशीर स्थलांतरित झालेल्या बांगलादेशी आणि पाकिस्तानी नागरिकांचा शोध घेण्याची सूचना केली आहे. अलीकडे राज्यात अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. या प्रकरणात बांगलादेशी आणि पाकिस्तानी बेकादेशीरपणे राज्यात तळ ठोकल्याचे निदर्शनास आले आहे. बेकादेशीरपणे विदेशी नागरिक राज्यात काम करीत आहेत. काहींनी याठिकाणी आधारकार्डसुद्धा तयार करून घेतल्याचेही समजले आहे, असे त्यांनी सांगितले.