बेंगळूर : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून शुक्रवारी देखील कमी रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान दिवसभरात 50 हजारहून अधिकजण संसर्गमुक्त झाले आहेत. ही बाब दिलासादायक आहे. राज्यात मागील चोवीस तासांत 32,218 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 52,581 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर दिवसभरात 353 जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. सध्या सक्रिय रुग्णसंख्या 5,14,238 इतकी आहे. राज्यात मागील चोवीस तासांत 1,33,013 कोविड चाचण्या करण्यात आल्या. त्या तुलनेत पॉझिटिव्ह अहवाल येण्याचे प्रमाण 24.22 टक्के इतके आहे. राज्यात आतापर्यंत 23,67,742 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर एकूण 18,29,276 जण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 24,207 जणांचा मृत्यू झाला आहे.
Related Posts
Add A Comment