प्रतिनिधी
पणजी
अंमदमानाच्या महासागरात तयार झालेल्या कमी दाबाचे चक्रिवादळात रुपांतर होण्याची शक्यता व्यक्त करून हवामान खात्याने दि. १३ व १४ ऑक्टोबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर राज्यातील विविध भागात मध्यम तथा हलक्या स्वरुपात त्याचबरोबर विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
गोव्यात काहि भागात शुक्रवारी सायंकाळी विजांच्या गडगडाटासह जोरदार तथा मध्यम स्वरुपात पाऊस पडला. आजहि विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. राज्यातील तापमानहि वाढलेले होते. त्याचबरोबर हवेतील आद्रतेचे प्रमाण ९२ टक्के एवढे होते. त्यामुळे पहाटेपासूनच उकाडय़ाची झळ जनतेला जाणवत होती. हवामान खात्याने दुपारी जारी केलेल्या माहितीनुसार गोव्यावर १४ ऑक्टोबर पर्यंत पावसाचे वातावरण राहिल. हाच परतीचा पाऊस असू शकतो. परंतु हा पाऊस पुढील चार ते पाच दिवस गोव्यात रहाणार आहे.