प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव उत्तर मतदारसंघात आमदार अनिल बेनके यांच्या सहकार्यातून कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले जात आहे. मंगळवारी अनसुरकर गल्ली, रामलिंगखिंड गल्ली व नेहरूनगर येथील बसवाण्णा मारुती मंदिरात लसीकरण करण्यात आले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱयांनी याला सहकार्य केले.
यावेळी खासदार मंगला अंगडी, माजी महापौर सरिता पाटील, अनिल नेर्लीकर, संतोष पेडणेकर, कपिल नेर्लीकर, हेमंत शिंदे, किशोर देसाई, विजय कदम, विजय हट्टीकर, अमित कल्लोळकर, श्रद्धा अंगडी, राहुल बडसकर, डॉ. मास्तमर्डी, तुकाराम पाटील, गंगाधर पाटील, सुरेशकुमार, ओंकार बर्डे, गौरव वाके, शरद पाटील, प्रमोद पाटील, श्रीधर सुतार, गणेश वाके, गजानन पाटील, विजय पाटील यांच्यासह इतर उपस्थित होते.