प्रतिनिधी / बेळगाव
रायबागचे आमदार दुर्योधन ऐहोळे यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यांनी स्वत: च्या फेसबुक अकाउंटवर याबाबत पोस्ट करून ही माहिती दिली आहे. मंत्रिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी खबरदारी म्हणून मंत्री, पत्रकार आणि पोलिस अधिकारी व मंत्रिमंडळात काम करणाऱ्या सदस्यांची स्वब घेण्याची सूचना करण्यात आली होती . याच पार्श्वभूमीवर रायबागच्या आमदारांची चाचणी घेण्यात आली. यावेळी ते पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले . तसेच त्यांची चाचणी झाली असली तरी अद्याप कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. तरीही ते स्वतः विलगीकरण कक्षात राहणार आहेत . यावेळी त्यांनी संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले आहे.