रवि. 14 ते 20 जून 2020
मेष
या सप्ताहात मिथुन राशीत सूर्य, धनुमध्ये प्लुटो वक्री, मीन राशीत मंगळ प्रवेश करीत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला तुम्हाला धावपळ होईल. तणाव वाटेल. प्रकृतीची काळजी घ्या. धंद्यात वाढ होईल. रागावर ताबा ठेवा. प्रवासात घाई करू नका. नोकरीत काम वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे डावपेच उपयुक्त ठरतील. परिचयात वाढ होईल. आर्थिक सहाय्य जमा करता येईल.
वृषभ
या सप्ताहात मिथुनेत सूर्य, धनु राशीत प्लुटो वक्री, मीनेत मंगळ प्रवेश करीत आहे. तुमची महत्त्वाची कामे करण्याची तयारी ठेवा. धंद्यात फायदा होईल. कायदा कुठेही मोडू नका. नोकरीत जम बसेल. वरिष्ठांना खूष कराल. घरातील नाराजी क्षुल्लक असेल. राजकीय, सामाजिक कार्यात नेटाने कार्य करा. लोकप्रियता मिळवा. त्याचा पुढे उपयोग होईल. कला, साहित्यात नवे करून दाखवा.
मिथुन
या सप्ताहात तुमच्याच राशीत सूर्य, धनु राशीत प्लूटो वक्री मीन राशीत मंगळ प्रवेश करीत आहे. सहनशीलता ठेवा. प्रश्न नीट समजावून घ्या. उत्तर शोधता येईल. धंद्यात तडजोड करावी लागेल. कायदा मोडू नका. नोकरीतील तणाव कमी करता येईल. घरातील वाद वाढू देऊ नका. व्यसनाने त्रास होईल. खाण्याची काळजी घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात तुम्हाला मेहनत जास्त पडेल. सल्ला योग्य व्यक्तीचाच घ्या.
कर्क
या सप्ताहात मिथुन राशीत सूर्य, धनुमध्ये प्लुटो वक्री, मीन राशीत मंगळ प्रवेश करीत आहे. धंद्यातील तुमचा अंदाज चुकणार नाही, याकडे लक्ष ठेवा. उत्साह वाढेल. ओळखी होतील. नवे काम मिळवा. नोकरीत तणाव होऊ शकतो. घरातील व्यक्तीची चिंता वाटेल. राजकीय, सामाजिक कार्यात अपमानास्पद घटना घडू शकते. वादविवादाने तणाव होईल. कला, साहित्यात नवा विचार आणता येईल.
सिंह
या सप्ताहात मिथुन राशीत सूर्य, धनुमध्ये प्लूटो वक्री, मीन राशीत मंगळ प्रवेश करीत आहे. धंद्यात वाढ होईल. वसुलीचा प्रयत्न करा. कामात बदल होईल. नोकरीत तुमच्याकडे किचकट काम दिले जाईल. धावपळ वाढेल. प्रकृतीची काळजी घ्या. हायबीपीकडे दुर्लक्ष नको. राजकीय, सामाजिक कार्यात प्रतिष्ठां मिळेल. परंतु विरोधक तणाव निर्माण करतील. योग्य व्यक्तीचे ऐका. प्रवासात सावध रहा.
कन्या
या सप्ताहात मिथुन राशीत सूर्य, धनुमध्ये प्लुटो वक्री, मीनेत मंगळ प्रवेश करीत आहे. रागावर ताबा ठेवा. प्रवासात सावध रहा. दुसऱयाच्या काठीने साप मारण्याचा प्रयत्न समाजात होतो. राजकारणात तसेच घडते. तुम्ही त्याला बळी पडू नका. लोकप्रियता मिळेल. समाज कार्य नीट करा. धंद्यात प्रगती होईल. वसुलीचा प्रयत्न करा. नोकरीत कामाचे कौतुक होईल. घरातील व्यक्तींना खूष ठेवाल. व्यसनाने समस्या येईल.
तुळ
या सप्ताहात मिथुनेत सूर्य, धनुमध्ये प्लुटो वक्री, मीन राशीत मंगळ प्रवेश करीत आहे. या आठवडय़ात धावपळ वाढू शकते. शारीरिक मानसिक तणाव सहन करावा लागेल. विरोधक अडचणी निर्माण करतील. घरात क्षुल्लक मतभेद होतील. प्रकृतीची काळजी घ्या. नोकरी टिकवा. धंद्यात नम्रता ठेवा. चातुर्य वापरा. गोड बोलून सर्व कामे करण्याचा प्रयत्न करा. वाहन हळू चालवा.
वृश्चिक
या सप्ताहात मिथुनेत सूर्य, धनुमध्ये प्लुटो वक्री, मीनेत मंगळ प्रवेश करीत आहे. धंद्यात चर्चा संयम ठेवून करा. काम मिळवा. वसुलीचा प्रयत्न करा. नोकरीत हुशारीचे कौतुक झाले तरी काम वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात विरोध मोठा होईल. गुप्त कारवाया होतील. प्रवासात सावध रहा. घरातील वृद्ध व्यक्तींची चिंता कराल. कला क्षेत्रात नवे करून दाखवा.
धनु
या सप्ताहात मिथुनेत सूर्य, तुमच्याच राशीत प्लुटो वक्री, मीनेत मंगळ प्रवेश करीत आहे. साडेसाती सुरू आहे. धंद्यात अडचणीवर मात करता येईल. नोकरीत कठीण काम करून दाखवाल. वादविवादाचा प्रसंग राजकीय, सामाजिक कार्यात वेळोवेळी येईल. नम्रता ठेवा. लोकप्रियता टिकवा. प्रवासात सावध रहा. प्रकृतीची काळजी घ्या. पुढे संधी येईलच. राजकारण शिका.
मकर
या सप्ताहात मिथुन राशीत सूर्य, धनूमध्ये प्लुटो वक्री,मीनेत मंगळ प्रवेश करीत आहे. तुमचा उत्साह, आत्मविश्वास जास्त वाढेल. धंद्यात काम मिळवा. गोड बोलून गिऱहाईक वाढवा. कायद्याचे पालन सर्वत्र करा. नोकरी टिकवा. रागावर ताबा ठेवा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचा धाक वाटेल. तुमच्यावर टिका होईल. तुमच्याकडून मदतीची अपेक्षा ठेवली जाईल. कला क्षेत्रात नवे कराल.
कुंभ
या सप्ताहात मिथुन राशीत सूर्य, धनुमध्ये प्लुटो वक्री, मीनेत मंगळ प्रवेश करीत आहे. साडेसाती सुरू आहे. धंद्यात खर्च वाढू शकतो. भागिदाराच्या बरोबर वाद होईल. नोकरीत काम वाढले तरी वरिष्ठांना खूष कराल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रगती होईल. तुमची जनहिताची योजना मार्गी लावा. लोकांच्या उपयोगी येईल, असे काम करा. खाण्याची काळजी घ्या. घरात क्षुल्लक तणाव होईल.
मीन
या सप्ताहात मिथुनेत रवि, धनुमध्ये प्लुटो वक्री, तुमच्याच राशीत मंगळ प्रवेश करीत आहे. धंद्यात सुधारणा कराल. वसुली करता येईल. संयम ठेवा. तुमचे महत्त्व सर्वत्र वाढेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. आश्वासन मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुम्हाला अधिकार मिळण्याची शक्मयता आहे. मान, प्रति÷ा वाढेल. जनतेच्या समस्या सोडवा. संसारात सुखद समाचार मिळेल. कला, साहित्यात प्रगती कराल.