रविवार दि.11 ते शनिवार दि.17 जुलै 2021
मेष
या सप्ताहात मेष राशीच्या चतुर्थात सूर्य, पंचमात शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात कायदा न मोडता कामे करा. वादविवादाचा प्रसंग येईल. सावध रहा. नोकरीत कामामध्ये नकळत चुका होतील. काळजी घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात तुम्हाला सहकार्य कमी मिळेल. रागावर ताबा ठेवून चर्चा करावी लागेल. प्रवासात घाई करू नका. प्रकृती सांभाळा.
वृषभ
या सप्ताहात कर्केत सूर्य, सिंहेत शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात फायदा होईल. मैत्रीत गैरसमज होऊ शकतो. नोकरीत तुमचे महत्त्व वाढेल. व्यसन करू नका. संसारात क्षुल्लक वाद होईल, खर्च वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात कोणतेही काम रेंगाळत ठेवू नका. समस्या वेळीच सोडवा.
मिथुन
या सप्ताहात कर्केत सूर्य, सिंहेत शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात फायदा वाढेल. नवे काम मिळवता येईल. चर्चा यशस्वी होईल. जुने येणे वसूल करा. नोकरीत कामाचा प्रभाव पडेल. राजकीय, सामाजिक कार्यात विस्तारपूर्वक कामे करता येतील. ओळखी वाढतील. आर्थिक सहाय्य जमा करू शकाल. संसारात चांगली घटना घडेल.
कर्क
या सप्ताहात तुमच्या राशीत सूर्य, सिंहेत शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात सप्ताहाच्या शेवटी चांगली घटना घडेल. मागील बाकी वसूल करा. नोकरीत झालेला गैरसमज दूर करता येईल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्या खंबीरपणाचे कौतुक होईल. समाजकार्य वेगाने पुढे नेता येईल. लोकप्रियता मिळेल. संसारातील तणाव कमी होईल.
सिंह
या सप्ताहात कर्केत सूर्य, तुमच्या राशीत शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात मोह ठेवू नका. मिळतेजुळते धोरण ठेवा. अहंकाराची, वादाची भाषा वापरू नका. राजकीय, सामाजिक कार्यात दगदग वाढेल. मनावर दडपण येईल. प्रवासात सावध रहा. राग वाढवणारी घटना घडेल. प्रकृतीची काळजी घ्या. घरातील वृद्ध व्यक्तीची मर्जी राखावी लागेल.
कन्या
या सप्ताहात कर्केत सूर्य, सिंहेत शुक्र प्रवेश करीत आहे. महत्त्वाची कामे करून घ्या. धंद्यात सौम्य भाषेत गिऱहाईकासमवेत बोला. व्यसनाने नुकसान होईल. नोकरीत तुमचा प्रभाव टिकून राहील. राजकीय, सामाजिक कार्यात पुढाकार घेऊन कामे करावी लागतील. कोणतीही समस्या रेंगाळत ठेवू नका. घरात मतभेद होईल.
तुळ
या सप्ताहात कर्केत सूर्य, सिंहेत शुक्र प्रवेश करीत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला मोठे काम करून घ्या. धंद्यात सुधारणा होईल. चर्चा यशस्वी होईल. नवे काम मिळवता येईल. मागील येणे वसूल करा. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. राजकीय-सामाजिक कार्यात महत्त्वाचा निर्णय घ्याल. पद मिळेल. संसारातील कमी भरून काढा.
वृश्चिक
या सप्ताहात कर्केत सूर्य, सिंहेत शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात नवा पर्याय समोर येईल. भागिदार मदत करेल. बाकी वसूल करा. नोकरीतील समस्या सप्ताहाच्या शेवटी सोडवता येईल. राजकीय, सामाजिक कार्यात उग्र स्वरुप धारण करून प्रश्न सुटणार नाही. नम्रता ठेवा. दूरवरचा विचार कराल. जीवनसाथीचा विचार करा.
धनु
या सप्ताहात कर्केत सूर्य, सिंहेत शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात वाद वाढवू नका. सप्ताहाच्या सुरुवातीला भेट घ्या. तडजोड करावी लागेल. नोकरीत वरि÷ांच्या समवेत वितुष्ट करू नका. राजकीय, सामाजिक कार्यात अडचणी येतील. मनावर दडपण येईल. दुखापत होऊ नये याची काळजी घ्या.
मकर
या सप्ताहात कर्केत सूर्य, सिंहेत शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात मोहाला बळी न पडता काम करा. तुम्हाला अडचणीतून मार्ग काढावा लागेल. नोकरीत नम्रता ठेवा. राग दाखवून उपयोग होणार नाही. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्यावर जबाबदारी दिली जाईल. लोकांची, सहकारी वर्गाची नाराजी होऊ शकते.
कुंभ
या सप्ताहात कर्केत सूर्य, सिंहेत शुक्र प्रवेश करीत आहे. सप्ताहात तुमच्यावर दबाव राहील. धंद्यात सावध रहा. रागावर ताबा ठेवा. प्रवासात घाई करू नका. आप्तेष्टांच्या मदतीस जावे लागेल. प्रकृतीची काळजी घ्या. नोकरीत व्याप वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्यावर टीका होईल. तुमच्या चुका ठळकपणे दाखवल्या जातील.
मीन
या सप्ताहात कर्केत सूर्य, सिंहेत शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात प्रसंगानुरुप निर्णय घ्या. पर्स सांभाळा. वाद कमी करा. नोकरीत वरि÷ांना खूष करता येईल. राजकीय, सामाजिक कार्यात मेहनत पडेल. प्रति÷ा मिळेल. जवळची माणसे द्वेष करतील. घरातील व्यक्तीच्या समवेत तणाव होईल. व्यसन नको. खर्च वाढेल.