रवि. 12 ते 19 सप्टेंबर 2021
मेष
या सप्ताहात मकरेत गुरु वक्री, कन्येत सूर्य प्रवेश करीत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला समस्या येईल. संयमाने प्रश्न सोडवता येईल. वाद वाढवू नका. धंद्यात चूक करू नका. अरेरावीची भाषा त्रासदायक ठरेल. नोकरीत कामाचा ताण राहील. वरि÷ांना कमी लेखू नका. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे डावपेच यशस्वी होण्यास विलंब होईल. अस्थिर होऊ नका. घरात खर्च वाढेल.
वृषभ
या सप्ताहात मकरेत गुरु वक्री, कन्येत सूर्य प्रवेश होत आहे. धंद्यात जम बसवा. वसुली करा. किचकट प्रश्न सोडवा. श्रीमारुती स्तोत्र वाचा. नोकरीत कामे पटापट होतील. बेकारांना नोकरी मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यातील अडचणी कमी होतील. वेगाने प्रगती करा. लोकसंग्रह वाढेल. प्रियजनांचा सहवास मिळेल. संसारात चांगला बदल कराल.
मिथुन
या सप्ताहात मकरेत गुरु वक्री, कन्येत सूर्य प्रवेश होत आहे. धंद्यात सावधपणे निर्णय घ्या. मनाविरुद्ध घटना घडतील. शांत रहा. समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. नोकरी टिकवा. राजकीय, सामाजिक कार्यात विरोधक त्रस्त करतील. तणाव येईल. ऐकीव गोष्टीवर एकदम पूर्णपणे विश्वास ठेवू नका. संसारात खर्च वाढेल. पोटाची काळजी घ्या. कायदा पाळाच.
कर्क
या सप्ताहात मकरेत गुरु वक्री, कन्येत सूर्य प्रवेश होत आहे. धंद्यात वाढ होईल. नवे काम मिळवण्याची जिद्द ठेवा. जुना वाद, गैरसमज मिटवण्याचा प्रयत्न करा. नोकरीत प्रभाव वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुम्हाला नव्या पद्धतीने योजनापूर्वक कामे करता येतील. वेळ फुकट घालवू नका. स्वतःच्या ध्येयावर लक्ष ठेवा. संसारात मनाप्रमाणे घटना घडतील. वसुली करा.
सिंह
या सप्ताहात मकरेत गुरु वक्री, कन्येत सूर्य प्रवेश होत आहे. व्यवसायात कामे येतील. गोड बोलून व्यवसाय वाढवा. मायामोह ठेवू नका. मोठा करार करू नका. वसुली करा. नोकरीच्या ठिकाणी कामात चूक करू नका. राजकीय, सामाजिक कार्यात सावध रहा. सतर्क रहा. अरेरावी नको. विरोधक मैत्रीसाठी पुढे येतील. आपला कोण परका कोण हे ओळखा. तडजोड करावी लागेल.
कन्या
या सप्ताहात मकरेत गुरु वक्री, कन्येत सूर्य प्रवेश होत आहे. उत्साह वाढेल. धंद्यात जम बसेल. चांगले काम करून दाखवाल. नोकरीत कामाचे कौतुक होईल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्या बुद्धीची चमक नजरेत भरेल. कठीण काम करून दाखवाल. लोकप्रिय व्हाल. संसारात चांगली घटना घडेल. स्पर्धा जिंकाल.
तुळ
या सप्ताहात मकरेत गुरु वक्री, कन्येत सूर्य प्रवेश करीत आहे. चौफेर सावध रहा. धंद्यात गोड बोला. संयमाने मत व्यक्त करा. दुखापत टाळा. प्रवासात घाई नको. कायदा पाळा. नोकरी टिकवा. राजकीय, सामाजिक कार्यात तडजोडीशिवाय पर्याय नाही. कामात चूक करू नका. भावनेच्या आहारी न जाता निर्णय घ्या. प्रति÷ा वाचवा. खर्च वाढेल. पद सांभाळा.
वृश्चिक
या सप्ताहात मकरेत गुरु वक्री, कन्येत सूर्य प्रवेश करीत आहे. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. धंदा वाढेल. मैत्रीत गोड बोला. वाद करू नका. भागिदारीत तणाव होऊ देऊ नका. पोटाची काळजी घ्या. राजकीय, सामाजिक कार्याला गती येईल. कठीण कामे करुन घ्या. नोकरीत वरि÷ांची मर्जी राखता येईल. संसारात चिडचिड करू नका. तरच फायदा होईल. स्पर्धेत प्रगती कराल.
धनु
या सप्ताहात मकरेत गुरु वक्री, कन्येत सूर्य प्रवेश करीत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला चिंताजनक घटना घडेल. तुमचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. नोकरीत प्रभाव पडेल. राजकीय-सामाजिक कार्यात प्रगती होईल. मोठे पद मिळण्याची आशा वाढेल, जिद्द ठेवा. स्पर्धा जिंकाल, धंद्यात वाढ होईल. वसुली करा. कर्जाचे काम होईल.
मकर
या सप्ताहात तुमच्या राशीत गुरु वक्री, कन्येत सूर्य प्रवेश करीत आहे. धंद्यातील समस्या कमी होईल. मेहनत घ्या. मोठे यश मिळवा. वसुली करा. नोकरीत तुमचे काम आवडेल. प्रगती करण्याची संधी मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात सुधारणा होईल. दौऱयात यश, कीर्ती मिळेल. कठीण कामे करून घेता येतील. स्पर्धा जिंकाल. संसारासाठी चांगला निर्णय घेता येईल.
कुंभ
या सप्ताहात मकरेत गुरु वक्री, कन्येत सूर्य प्रवेश होत आहे. धंद्यात दादागिरी करू नका. कायदा सर्व ठिकाणी पाळा. नोकरीत तणाव होईल. सावध रहा. प्रवासात घाई नको. दुखापत होईल. कठोर बोलणे टाळा. राजकीय, सामाजिक कार्यात अडचणी येतील. प्रति÷sवर, बोलण्यावर विरोधक टीका करतील. बेसावध राहू नका. पद सांभाळा. स्पर्धा करू नका.
मीन
या सप्ताहात मकरेत गुरु वक्री, कन्येत सूर्य प्रवेश करीत आहे. कठीण कामे करून घ्या. धंद्यात वाढ होईल. सुधारणा करण्याची संधी मिळेल. तात्पुरता फायदा देणारा छोटासा धंदासुद्धा करा, चालेल. नोकरीत प्रभाव वाढेल. मैत्रीत सावध रहा. मोह टाळा. राजकीय, सामाजिक कार्यात प्रगती कराल. व्यसन नको. पोटाची काळजी घ्या.