रवि. 7 ते 13 नोव्हें. 2021
मेष
या सप्ताहात चंद्र गुरु लाभयोग, बुध, मंगळ युती होत आहे. धंद्यात जम बसेल. थकबाकी वसूल करा. नवीन कामे घ्या. नोकरीत वरि÷ांना खूष ठेवता येईल. नवीन नोकरीसाठी संधी शोधा. राजकीय, सामाजिक कार्याला योग्य दिशा मिळाल्याने तुमचा आत्मविश्वास अधिक वाढेल. संघटनात्मक कार्यात प्रगती कराल. अधिकारप्राप्ती होईल. संसारात शुभ समाचार मिळेल. अविवाहितांना चांगली स्थळे मिळतील. संततीप्राप्तीचा प्रयत्न करता येईल. कला, क्रीडा, साहित्य यात प्रगती होईल. पैसा मिळेल.
वृषभ
या सप्ताहात चंद्र, गुरु युती, बुध, हर्षल प्रतियुती होत आहे. धंद्यात बेसावध राहू नका. हिशोब नीट तपासून पहा. महत्त्वाच्या वस्तू हरवाल. प्रवासात वाहनाचा वेग कमी ठेवा. नोकरीच्या कामात दक्ष रहा. मैत्रीत तणाव होईल. स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या. घरातील वृद्ध व्यक्तीची चिंता राहिल. घरासंबंधी प्रश्न निर्माण होईल. राजकीय, सामाजिक कार्यात धावपळ होईल, वादविवाद वाढेल. आरोप येतील. नम्रता ठेवा. कोर्टाच्या कामात वाकडी वाट धरू नका. नवीन ओळखीवर भाळून जाऊ नका. व्यसन करू नका.
मिथुन
या सप्ताहात सूर्य, चंद लाभयोग, बुध, मंगळ युती होत आहे. धंद्यात वाढ होईल. नव्या कामासंबंधी प्रयत्न करा. घर, जमीन खरेदी विक्रीत फायदा होईल. कायदा मात्र पाळा. नोकरीत वरि÷ तुमच्यावर मोठय़ा कामाची जबाबदारी देतील. राजकीय, सामाजिक कार्यात प्रगती होईल. भाषणाचा प्रभाव पडेल. योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. संसारात मुलांच्या प्रगतीची बातमी मिळेल. प्रेमाला चालना मिळेल. कला, क्रीडा, साहित्यात अग्रेसर राहण्याचा प्रयत्न करा. कर्जाचे काम करून घ्या.
कर्क
या सप्ताहात चंद्र, गुरु लाभयोग, बुध, मंगळ युती होत आहे. धंद्यात किरकोळ कारणाने होणारा वाद वाढवू नका. भागिदाराबरोबर तणाव होईल. मैत्रीत गैरसमज होईल, खर्च वाढेल. खाण्या-पिण्याची काळजी घ्या. प्रवासात सावध रहा. नोकरीत काम वाढेल, यांत्रिक बिघाडामुळे कामे रेंगाळण्याची शक्मयता आहे. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्या स्पष्टवक्तेपणाने तणाव होईल. कुणालाही कमी लेखू नका. मोहात फसू नका. कला, क्रीडा, साहित्यात तडजोड करावी लागेल.
सिंह
या सप्ताहात चंद्र, शुक्र युती, सुर्य, चंद्र लाभयोग होत आहे. धंद्यात वाढ होईल. तुमचा उत्साह, उमेद वाढेल. नवीन कामात मन एकाग्र करा. थकबाकी वसूल करा. नोकरीत बुधवार, गुरुवारी हुशारीने प्रश्न सोडवा. तुमचे महत्त्व टिकवून ठेवा. राजकीय, सामाजिक कार्यात महत्त्वाची कामे प्रथम करा. चर्चा बैठक, यशस्वी होईल. नवीन ओळखीचा उपयोग करून घेता येईल. जुना वाद मिटवण्याचा प्रयत्न करा. कोर्टाच्या कामात सावध रहा. संसारात अनेक ठिकाणी तुम्हाला लक्ष द्यावे लागेल. तुमच्या कामाची प्रशंसा होईल. कला, क्रीडा, साहित्यात चमकाल. वरि÷ांचे सहाय्य घेता येईल.
कन्या
या सप्ताहात चंद्र, गुरु लाभयोग, बुध, मंगळ युती होत आहे. धंद्यात सुधारणा होईल. तुमच्या मेहनतीला प्रोत्साहन देणारे वातावरण राहिल. सप्ताहाच्या शेवटी वाद, तणाव होईल. नम्रता ठेवा. अनाठायी खर्च टाळावा लागेल. गोड बोलून कामे करून घ्या. नोकरीत कठीण कामे करून दाखवाल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे विचार, आचार कौतुकास्पद ठरतील. योजनांना वेगाने पूर्ण करा. कोर्टाच्या कामात यश मिळवता येईल. संसारात राहून गेलेले एखादे कार्य आनंदात साजरे करता येईल. कला, क्रीडा, साहित्यात प्रगती होईल.
तुळ
या सप्ताहात चंद्र, शुक्र युती, बुध, मंगळ युती होत आहे. धंद्यातील समस्या सोडवता येईल. नियमांच्या कक्षेत राहून कामे करा. नवे धोरण वापरता येईल. जिद्द ठेवा. नम्रता ठेवा. थकबाकी वसूल करा. नोकरीत तुमच्या कामाचा प्रभाव पडेल. परिचयातून कामे होतील. राजकीय, सामाजिक कार्यात मोठे आव्हान स्वीकारावे लागेल. शांत डोक्मयाने विचार करा. योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. अधिकारात वाढ होण्याची शक्मयता. घरातील कामे करून घेता येतील. कला, क्रीडा, साहित्यात प्रेरणादायक वातावरण राहिल.
वृश्चिक
या सप्ताहात चंद्र, गुरु लाभयोग, चंद्र, शुक्र युती होत आहे. प्रत्येक दिवस तुम्हाला यशाकडे नेणारा असला तरी रागावर ताबा ठेवा. अहंकाराची भाषा तुम्हाला रसातळाला नेणारी ठरू शकते. प्रवासात सावध रहा. धंद्यात उतावळेपणा करून चालणार नाही. चौफेर सावध रहा. करार करताना दूरवरचा विचार जरुर करा. राजकीय, सामाजिक कार्यात विरोधक हल्लाबोल करतील. आरोप येईल. बोलताना मोठी चूक होऊ शकते. संसारात इतरांना मदत करावी लागेल. स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. नोकरीत वरि÷ांचा सल्ला मानावा लागेल. कोणत्याही स्पर्धेसाठी जास्त मेहनत घ्या.
धनु
या सप्ताहात सूर्य, चंद्र लाभयोग, बुध, मंगळ युती होत आहे. साडेसाती सुरू असली तरी तुमच्या प्रत्येक कार्याला नवे वळण देता येईल. व्यवसायातील गुंता लवकर सोडवा. वसुली करा. मोठे कंत्राट घ्या. नोकरीत वरि÷ांना खूष करणारे कठीण काम करून दाखवाल. राजकीय, सामाजिक कार्याला वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न करा. दौऱयात यश मिळेल. भाषण प्रभावी ठरेल. अनेक चांगल्या वाईट अनुभवांचा उपयोग करून घेता येईल. प्रेमाला चालना मिळेल. अविवाहितांना स्थळे मिळतील. कला, क्रीडा, साहित्यात अग्रेसर रहाल.
मकर
या सप्ताहात चंद्र, बुध लाभयोग, बुध, मंगळ युती होत आहे. साडेसाती सुरू आहे. तुमच्या धंद्यात असलेला तणाव, समस्या सोडवता येईल. जिद्दीने प्रयत्न करा. सोमवार, मंगळवार सौम्य धोरण ठेवा. कर्जाच्या कामास सहाय्य केल्याने चांगल्या बढतीची शक्यता दिसेल. बेकारांना नोकरी शोधता येईल. राजकीय, सामाजिक कार्याचा विस्तार मनाप्रमाणे करू शकाल. जवळच्या मंडळींना दुखवू नका. वेळेला महत्त्व देत रहा. संसारात खर्च वाढेल. गैरसमज होईल. व्यसनात वेळ घालवू नका.
कुंभ
या सप्ताहात सूर्य, चंद्र लाभयोग, बुध, मंगळ युती होत आहे. साडेसातीचे पर्व सुरू आहे. धंद्यात रेंगाळून राहिलेले काम वेगाने पूर्ण करा. कायदा सप्ताहाच्या मध्यावर मोडू नका. नवे कंत्राट घेता येईल. कर्जाच्या कामात सुधारणा होईल. . जुने येणे वसूल करा. नोकरीत कामाचा ताण असला तरी तुमचे वर्चस्व राहिल. राजकीय, सामाजिक कार्यात चौफेर सावध रहा. जवळच्या व्यक्तींची योग्य ती मदत मिळेल. वरि÷ तुम्हाला एखादे महत्त्वाचे गुपित सांगतील. संसारातील कामे करून घेता येतील. स्पर्धेत प्रगती कराल.
मीन
या सप्ताहात चंद, गुरु लाभयोग, चंद्र, शुक्र युती होत आहे. घाई गडबडीत धंद्यात निर्णय घेऊ नका. भागिदाराच्या बरोबर जुळवून घ्यावे लागेल. शांत डोक्मयाने विचार करा. वाहनाचा वेग कमी ठेवा. दुखापत होईल. वसुली करण्याचा प्रयत्न करा. नोकरीच्या कामात चूक होईल. सावध रहा. बोलण्यातून वाद, गैरसमज वाढेल, असे कृत्य टाळा. राजकीय, सामाजिक कार्यात प्रति÷ा सांभाळा. चुकीचे विधान केल्याने वरि÷ नाराज होतील. घरातील वृद्ध व्यक्तीवर चिडू नका. त्यांच्या प्रकृतीची काळजी घ्या. स्पर्धा कठीण आहे.