बुध. दि. 24. 11. 2021
गुरुविण कोण दाखविल वाट?
(गुरु- राशीबदल 20 नोव्हें. 2021)
पराशक्तीला, गुरुजनांना आणि वाचकांना सविनय, सादर नमस्कार. माझ्या पहिल्याच लेखाला तुम्ही दिलेल्या उदंड प्रतिसादाने भारावून गेलो आहे. धन्यवाद म्हणणार नाही. मला या ऋणातच राहायला आवडेल. ज्योतिषसारखा रुक्ष, क्लिष्ट आणि गणिती विषय साध्या सोप्या भाषेत आणि तुमचा ज्याने फायदा होईल या पद्धतीने मांडायचा प्रयत्न करेन. याचसाठी ग्रहस्थिती, कुठला ग्रह कुठे आहे, डिग्री योग अशा ज्योतिषिय भाषेचा प्रयोग करणार नाही. ज्यांना हे जाणून घ्यायचे आहे त्यांच्यासाठी क्मयू आर कोड देण्यात येईल जो स्कॅन केल्यावर संपूर्ण माहिती मिळेल.
आता आजच्या आपल्या विषयाकडे वळू. 20 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 1 वाजून 22 मिनिटांनी गुरु ग्रहाने कुंभेत प्रवेश केला. फेसबुक, वॉटस् ऍप, ट्विटर आणि टीव्ही वर चित्रविचित्र माळा घातलेल्या (ॐ फट स्वाहा टाईप!) ज्योतिषांनी धुमाकूळ घालायला सुरुवात केली.
कृपया लक्षात घ्या.
मुद्दा (1) केवळ एका ग्रहाच्या गोचरीने काहीही परिणाम होत नसतो. सगळे ग्रह मिळून फळ देतात. मुद्दा (2) ग्रहाने राशीत प्रवेश केला रे केला की लगेच तो फळ देईलच असे नाही. गुरुच्या कुंभेमध्ये प्रवेश करून फळ देण्याला जानेवारीचा दुसरा- तिसरा आठवडा यावा लागेल.
आता गोचर भ्रमण म्हणजे काय हे समजून घेऊ. पृथ्वी हे केंद्र मानून आकाशाचे 12 भाग केले तर 1 भाग हा 30 अंशाचा होईल. बरोबर ना? हा एक भाग म्हणजे एक रास! ग्रह हे गतीशील आहेत, जसे शनिला एक रास ओलांडायला अडीच वर्ष लागतात. सूर्याला 1 महिना लागतो तसे गुरुला साधारणपणे 1 वर्ष लागते. म्हणजे गुरु हा मकरेत होता आता तो कुंभेत गेला आहे.
आता गुरु ग्रहामुळे काय होते? तर गुरु ग्रहाला लाल किताब ज्योतिषात ‘नसीब’ म्हटले आहे. तुमच्या आयुष्यात ज्या शुभ गोष्टी आहेत त्या गुरुमुळे आहेत. तुम्ही काय शिकणार? किती शिकणार? किती आणि कसे कमवणार? तुमचा विवाह, संतती, कुटुंब, धार्मिक यात्रा, भाग्य, लाभ हे सगळे गुरुमुळे आहे असे पारंपरिक ज्योतिषशास्त्र सांगते. पत्रिकेमधले हजार दोष जर गुरु पहिल्या घरात म्हणजे लग्न स्थानात असेल तर नाहीसे होतात, असे म्हणतात. इतकेच काय तर पितृदोषसुद्धा गुरुच्या दृष्टीमुळे नाहीसा होतो. म्हणूनच गुरुला दाता म्हटले आहे. म्हणूनच ‘गुरुविण कोण दाखविल वाट?’
विवाहाच्या दृष्टीनेसुद्धा गुरुचे महत्त्व फार आहे. विवाह ठरवताना ‘इतवा’ गुरु असे तुम्ही ऐकले असेलच. मुलीचा विवाह ठरवताना दुसरा, पाचवा, सातवा, नववा किंवा अकरावा गुरु असावा लागतो.
आता नेहमीप्रमाणे जरा वेगळा विचार करूया! गुरु तपस्वी आहे, कर्मठ आहे, निती नियम पाळणारा आहे, सात्विक आहे. या उलट शुक्र हा दैत्यांचा गुरु आहे. छान छौकीचा कारक आहे. प्रणयी आहे, त्याला नशेचे वावडे नाही. रोमान्सचा चाहता आहे. आता सांगा की आजच्या घडीला आपल्यावर परिणाम कुणाचा जास्त आहे? गुरुचा की शुक्राचा? असो!! पुढच्या वेळी प्रत्येक राशीवर गुरु पालटाचा काम परिणाम होईल हे सांगतो.
आपला आठवडा आनंदी जाओ. ‘जो जे वांछील तो ते लाहो.’ शुभं भवतु.
सोपी वस्तू टीपः घरात एखादी वस्तू संपली की मग आपण दुसरी आणतो. पण खालील वस्तू कधीच पूर्ण संपू देऊ नका. 1. साखर, 2. आटा, 3. मीठ, 4. हळद, 5. तांदूळ
मेष
संमिश्र ग्रहमान तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. तुमच्या चपळतेला प्रयत्नांची साथ लाभेल. वाहन योग. खेळाडूंना उत्तम यश, गुप्त शत्रूंपासून सावध रहा. जोडीदारांची तब्येत सांभाळा. अचानक धनलाभ, कष्ट केल्याने भाग्याची साथ मिळेल. जास्त लाभाची अपेक्षा ठेऊ नका.
उपाय- उपासनाः गुरुवारी दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान दत्तमहाराजांचे दर्शन घ्या.
सावध रहाः शनिवार, शुक्रवार
शुभ अंकः 5, शुभ रंगः राखाडी.
वृषभ
तब्येतीची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. छोटय़ा तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. या आठवडय़ात कुटुंबियांसोबत विसंवाद होणार नाही याची काळजी घ्या. अडलेली कामे होतील. प्रॉपर्टीसंबंधी व्यवहाराला योग्य वेळ, प्रेमीजनांना बुधवार विशेष लाभाचा. विरोधक शांत होतील. जोडीदाराबरोबर वेळ आनंदात घालवाल. वाहन चालवताना घाई नको. स्वभावामुळे बदनामी होऊ नये याची काळजी घ्या.
उपाय/उपासनाः बुधवारी श्री विष्णूंच्या मंदिरात हिरवे वस्त्र दान करा.
सावध रहाः गुरुवार, शनिवार व मंगळवार
शुभ अंकः 3, शुभरंगः आकाशी
मिथुन
स्वास्थ्यासंबंधी तक्रारी कमी होतील. धनप्राप्तीचे मार्ग मिळतील. कौटुंबिक सौख्य उत्तम मिळेल. वाटाघाटी यशस्वी होतील. कलाकारांना नवीन प्रेरणा मिळेल. हितशत्रुंपासून सावध रहाण्याची वेळ. जोडीदाराबरोबर मतभेद संभवतात. आठवडय़ाच्या मध्याला मानसिक ताण येईल. भाग्याची साथ कमी आहे. कठोर परिश्रम केले तरच लाभ होईल.
उपाय/ उपासनाः मंगळवारी लाल वस्तूचे दान एखाद्या सुरक्षाकर्मीला करा.
सावध रहाः मंगळवार, बुधवार
शुभ अंकः 8, शुभ रंगः काळा.
कर्क
तब्येतीची साथ उत्तम राहील. कुटुंबासोबत सहलीचे बेत आखाल. एखादी शुभ वार्ता मिळेल. नवीन फर्निचर घेण्याचे योग. प्रेमप्रकरणात यश. शेअर्समध्ये जर पैसे गुंतवत असाल तर परतावा चांगला मिळेल. शत्रुंचे काही चालणार नाही. भाग्य साथ देईल. आठवडय़ातील सर्वात नशीबवान रास पण दैव देते आणि कर्म नेते अशी परिस्थिती.
उपाय/ उपासनाः सोमवारी ‘श्री शिवाय नमस्तुभ्यं’ मंत्राचा जमेल तितका जप करावा.
सावध रहाः मंगळवार, गुरुवार
शुभ अंकः 1, शुभ रंगः मरून
सिंह
मानसन्मान जपण्याकडे तुमचा जो कल असतो. त्यामुळे धोका टळेल. तब्येतीची साथ उत्तम. अतिश्रमाने थकवा येईल. परिवारातील वृद्ध व्यक्तिंची काळजी घ्या. तुमच्या संभाषण चातुर्यामुळे वादाचे प्रसंग टळतील. बांधकाम व्यावसायिकांना संधीचे सोने करण्याची योग्य वेळ. प्रेमप्रकरणात फसवणुकीची शक्मयता. तत्काळ आर्थिक लाभाच्या मोहात पडू नका. कामाच्या ठिकाणी विरोधक सक्रीय असतील. वैवाहिक जोडीदार नाराज होऊ नये, याची काळजी घ्यावी लागेल. भाग्याची साथ उत्तम.
उपाय/ उपासनाः रविवारी पित्याला दुग्धजन्य मिठाई द्या. ज्ये÷ांचा आशीर्वाद घ्या.
सावध रहाः शनिवार, गुरुवार, सोमवार
शुभ अंकः 3, शुभरंग ः गर्द निळा.
कन्या
तब्येत सुधारते आहे. पण पथ्यपाण्याकडे दुर्लक्ष नको. एखाद्या कौटुंबिक समारंभात सामील होऊन भेटीगाठींचा आनंद घ्याल. छोटा मोठा प्रवास संभवतो. नवीन वास्तू किंवा वाहनासंबंधी निर्णय आताच नको. बुधवारी अचानक धनलाभ होऊ शकतो. संततीकडून सुवार्ता. रक्तदाब असलेल्यांनी मंगळवारी विशेष काळजी घ्यावी. व्यावसायिक भागिदारीतून लाभ. संशोधकांसाठी उत्तम आठवडा. परदेशी जाण्याची इच्छा असलेल्यांनी प्रयत्न करावा.
उपाय/ उपासनाः गुरुवारी दत्तमहाराजांना पांढऱया फुलांची माळ अर्पण करावी.
सावध रहाः रविवार, शुक्रवार आणि शनिवार
शुभ अंकः 1, शुभ रंगः पांढरा
तुळ
गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या तब्येतीच्या किरकोळ तक्रारी कमी होतील. समोरच्याप्रमाणे वागणे कमी करा. निर्णय क्षमता सुधारा. तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील. धनप्राप्ती उत्तम आळसामुळे कामे पुढे ढकलली जातील. जागेच्या वाटाघाटींकरता बुधवार उत्तम. संततीकडून मनस्ताप मोठय़ा गुंतवणुकीकरता योग्य वेळ नाही. नोकरदारांना वरी÷ांचा जाच. जोडीदाराची उत्तम साथ. छोटे मोठे अपघातापासून सावध रहा. मानसन्मान आणि प्रसिद्धीचे योग. मित्रांमुळे लाभ.
उपाय /उपासनाः सोमवार रुद्राभिषेक करा.
सावध रहाः बुधवार, गुरुवार, शुक्रवार
शुभ अंकः 3, शुभ रंगः क्रमी
वृश्चिक
संधीचे सोने कराल. आठवडय़ाची सुरुवात उत्तम राहील. शुक्रवारी व शनिवारी तब्येत सांभाळावी. घरात भांडणामुळे मनस्ताप होईल. छोटा प्रवास टाळा. आईच्या प्रकृतीची काळजी घ्या. विरोधकांची कारस्थाने बळावतील. वैवाहिक जोडीदाराशी मतभेद, भाग्याची उत्तम साथ असल्याने आणि तुमच्या कष्ट करण्याच्या जिद्दीमुळे उत्तम लाभाचे योग. मित्रांबरोबर वेळ घालवाल.
उपाय/ उपासनाः बुधवारी लहान मुलीला एखादे खेळणे भेट म्हणून द्या.
सावध रहाः सोमवार, बुधवार
शुभ अंकः 4, शुभ रंगः पांढरा
धनु
तब्येत सांभाळा. प्रतिकारशक्ती कशी वाढेल याकडे लक्ष द्या. बाहेरचे खाणे शक्मयतो टाळा. ज्ये÷ांची साथ मिळेल. बुधवारी आणि मंगळवारी प्रवास टाळा. लिखित व्यवहाराच्या बाबतीत सावधान. गुरुवार गुंतवणुकीकरता उत्तम. नोकरदारांकरता आठवडा हा कामाच्या अतिरेकामुळे त्रासाचा. वैवाहिक जोडीदाराच्या मनाप्रमाणे वागावे लागेल. भाग्याची साथ उत्तम. पण तरीही कष्ट जास्त आणि लाभ कमी.
उपाय/ उपासनाः रविवारी गरजुला गव्हाचे पीठ दान करा.
सावध रहाः बुधवार, मंगळवार
शुभ अंकः 7, शुभ रंगः हलका निळा.
मकर
कंजुषपणा सोडून कुटुंबाकरता खर्च करा. मंगळवारी कुटुंबातल्या एखाद्या वृद्ध व्यक्तिची चिंता सतावेल. रविवार व सोमवार छोटय़ा प्रवासाचे योग. वाहनाच्या दुरुस्तीकडे लक्ष द्या. खेळाडूंना अपेक्षित संधी मिळणार नाही. गुप्तशत्रूपासून सावध रहा. विशेषतः मंगळवारी, जोडीदाराच्या प्रेरणेने एखादे अवघड काम करू शकाल. सतत व्यस्त रहाण्याच्या तुमच्या स्वभावामुळे अनेक कामे सहजपणे होऊन जातील. मित्र परिवारासोबत वेळ घालवाल.
उपाय/ उपासनाः शुक्रवारी देवीला लाल फुलांची माळ अर्पण करा.
सावध रहाः गुरुवार, मंगळवार व सोमवार
शुभ अंकः 6, शुभ रंगः नारिंगी.
कुंभ
तब्येतीची विशेष काळजी घेण्याची वेळ. कुठलेही आजारपण अंगावर काढू नका. कौटुंबिक सौख्य उत्तम. लेखकांना प्रसिद्धीचे योग. बोलण्यामुळे मने जिंकाल. गुरुवारी छोटय़ा यात्रेचे योग. घरातील गळती किंवा पाण्याचा अपव्यय टाळा. प्रेमींना आठवडा त्रासाचा. नोकरदार वर्गाला अधिकारी क्यक्तिंकडून सांभाळून राहण्याची गरज. विवाहोत्सुक लोकांची लग्ने ठरतील. शुक्रवारी अपघातापासून सावध. कष्टांचे चीज झाले नाही असे वाटेल.
उपाय/ उपासनाः शुक्रवारी सवाष्णीला वस्त्रदान करा. महिलांचा आदर करा.
सावध रहाः बुधवार व शुक्रवार
शुभ अंकः 7, शुभ रंगः हिरवा
मीन
भोळय़ा स्वभावामुळे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. कुटुंबाची साथ उत्तम मिळेल. शुभ कार्यासाठी एकत्र याल. अपशब्द वापरल्याने नकळत एखाद्याचे मन दुखवाल. यात्रा टाळा. विशेषतः मंगळवारी वास्तुकरता प्रयत्न करत असाल तर रविवार आणि बुधवार विशेष लाभदायक छोटय़ा गुंतवणुकीतून आर्थिक लाभ. प्रेमी जनांनी मित्र परिवारांकडून सावध राहण्याची गरज. शत्रू मित्राच्या रुपात येऊन नुकसान करतील. जोडीदारापासून आर्थिक व्यवहार लपविल्यामुळे वाद होऊ शकतो. अति अध्यात्मिकता टाळा.
उपाय/ उपासनाः मंगळवार मारुतीला लाल फूल अर्पण करा आणि बुंदीच्या लाडवाचा नैवेद्य दाखवा.
सावध रहाः मंगळवार, सोमवार
शुभ अंकः1, शुभ रंगः पिवळा.