16 ते 22 फेबुवारी 2022 पर्यंत
नमस्कार, मूलांक म्हणजे तुमच्या जन्मतारखेची (महिना व साल धरू नये.) एकांकी बेरीज. जर तुमची जन्मतारीख 1 ते 9 मधली असेल तर तुमची जन्मतारीख हाच तुमचा मूलांक. समाजा तुमची जन्मतारीख दोन आकडी असेल तर दोन्ही आकडय़ांची एकांकी बेरीज म्हणजे मूलांक. उदा. जन्मतारीख 29 असेल तर 2+9ा11, 1+1ा2 म्हणजे 2 हा मूलांक!
मूलांक 7- केतू ग्रह तुमचा स्वामी। एकांतप्रिय तुम्ही शोध गामी । अध्यात्मात गती राम नामी। तुम्हा पूर्वाभासाचे वरदान ।। यावषी घडे प्रवास। गुंतवणूक आर्थिक निवेश। आपली छबी राखण्या स्वच्छ। यत्न करावा लागेल ।। बेरोजगारांना मिळेल काम । शत्रू करतील हैराण । कर्ज घेताना सावधान । फेडताना त्रास होईल। करियर असेल उत्तम। विदेश गमन, धंद्यात लाभ । कार्यस्थळी शत्रूंचे मन । तुम्हा पाडावयाचे असेल ।।। खर्च शिक्षणाकरता होईल। नात्यात कटुता येईल । तब्येतीची चिंता होईल । सावध रहावे यावषी ।।
मूलांक 8- शनि ग्रह तुमचा दाता । संघर्षाशी तुमचा नाता। विलंब होऊन सगळे मिळता । मन खिन्न असते तुमचे ।। महत्त्वाकांक्षी तुमचा स्वभाव। तुम्ही कष्टाळू अन् उदार। साहसाने करावे करार। तुम्हा यावषी जरी संघर्ष असेल। तुमची बुद्धी मात करेल। कर्ज मात्र वाढेल। तेवढे तुम्ही सांभाळा।। कामाच्या अती व्यापात। नातेसंबंधात येई दरार। कटुता विसरुन पार। प्रेम तुम्ही सांभाळा।। वर्षाच्या सुरुवातीला । ताण असेल मनाला। डोकेदुखी दृष्टीदोषाला। हलके न घ्यावे।।
मूलांक 9- मंगळ करेल मंगल। तुम्ही साहसी अन् निडर। उत्साही, मनाने तरल। स्वभाव असे तुमचा।। करा मेहनत, उपसा कष्ट । आळसाला करा नष्ट । बोलणे नम्र पण स्पष्ट । मग यश तुमचेच ।। राजकारणी सन्मान । यशाची चढती कमान । नोकरीत प्रमोशन अन् मान। या वर्षी असेल । कुटुंबाची कराल फिकीर। थोडी कुरबूर, किरकिर । औषधोपचार तीर । अनारोग्यासी मारावा।।
महाउपाय- काहीवेळा ऑपरेशनची वेळ येते आणि माणूस धास्तावतो. अशावेळी एक सोपा उपाय करावा. पिंपळाचे भोक न पडलेले पान घ्यावे. गंगाजलाने धुवावे. अनामिकेने त्यावर मधाचा थर लावावा. चंदन उगाळून त्याची मोठी गोळी करावी आणि पानावर शिवलिंगाप्रमाणे ठेवावी. हे शिवलिंगाचे पान शिवालयातल्या शिवलिंगाच्या निमुळत्या भागाकडे असे ठेवावे की पानाचे टोक निमुळत्या बाजूला असेल. कळकळीने प्रार्थना करावी. भोलेनाथ पावतो.
सोपी वास्तू टीपः लिव्हिंग रूम नेहमी उत्तर, उत्तर-पूर्व किंवा उत्तर-पश्चिम दिशेकडे असावे. तिथे गडद रंग असू नयेत.
मेष
आर्थिक आणि कौटुंबिक सुखाच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे. मात्र तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रवासात तब्येत बिघडू शकते. शेजाऱयांबरोबर वाद संभवतो. स्थावर मालमत्तेचे व्यवहार टाळा. नोकरदारांना अनुकूल काळ आहे. वैवाहिक सुख उत्तम. भाग्याची उत्तम साथ आहे.
उपायः मंगळवारी मसूर दान करा.
वृषभ
उत्साह ओसरू देऊ नका. तब्येत उत्तम राहील. प्रेमसंबंधात वृद्धी होईल. शेअर्समध्ये फायदा. संतती सुख चांगले असेल. कौटुंबिक वाद वाढू देऊ नका. प्रवास टाळा. लेखी व्यवहारात सावध रहा. नोकरदारांवर वरि÷ खूष असतील. वैवाहिक जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. वाहन जपून चालवा. उपायः बुधवारी देवीच्या मंदिरात लाल किंवा हिरवे वस्त्र अर्पण करा.
मिथुन
जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. वाहन खरेदीचे योग. तब्येतीच्या छोटय़ा मोठय़ा तक्रारी संभवतात. धनप्राप्तीसाठी जास्त मेहनत घ्यावी लागेल. कुटुंबात वाद होतील. प्रेमीजनांना अनुकूल काळ आहे. नोकरदारांना कष्टाचे फळ मिळेल. वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण येतील. उपायः गुरुवारी गुरुमंदिरात सेवा करा.
कर्क
तब्येतीकडे विशेष लक्ष द्या. दुर्लक्ष केल्यास आजार बळावेल. बोलण्यामुळे गैरसमज होऊ शकतात. भावंडांची साथ मिळेल. स्थावर संपत्तीचे सुख मिळेल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा होईल. संतती सुख उत्तम. नोकरदारांना पगारवाढ. वैवाहिक जोडीदाराशी मतभेद संभवतात. अपघातापासून सावध रहा. उपायः सुरक्षा कर्मींला लाल वस्तू भेट द्या.
सिंह
धनप्राप्ती उत्तम राहील. बँक बॅलन्स वाढेल. कौटुंबिक सुख उत्तम. बोलण्यात नम्रता ठेवा. फायदा होईल. लेखी व्यवहारात यश. वाहन खरेदीचे योग आहेत. शेअर्समध्ये फायदा. प्रेमसंबंधात मधुरता येईल. नोकरदारांना बॉसचे बोलणे खावे लागेल. वैवाहिक जोडीदाराच्या वागण्यामुळे मनस्ताप होईल. उपाय-गुरुवारी दत्तमहाराजांना पिवळय़ा गुलाबाचा हार अर्पण करा.
कन्या
तब्येतीची उत्तम साथ राहील. धनप्राप्तीचे नवे मार्ग मिळतील. कुटुंबातील वातावरण चांगले असेल. लेखन कार्यात यश. पाहुणे येतील. घरासाठी नवीन वस्तू घ्याल. प्रेमसंबंधात तणाव असेल. नोकरीमध्ये सहकारी पाय खेचण्याचा प्रयत्न करतील. वैवाहिक जोडीदाराशी मतभेद संभवतात. उपाय-गुरुवारी हळदीचे दान करा.
तुळ
तब्येत उत्तम राहील. तुमच्या बोलण्यामुळे बरेचसे प्रश्न सुटतील. धनप्राप्ती उत्तम आहे. कौटुंबिक सुख मिळेल. प्रवासाचे योग. लेखी व्यवहारात यश. आईच्या तब्येतीची काळजी घ्या. कोणत्याही परिस्थितीत शेअर्समध्ये गुंतवणूक करू नका. संततीच्या तब्येतीला जपा. नोकरदारांनी संयम बाळगावा. उपाय- शुक्रवारी साखर दान करा.
वृश्चिक
तब्येतीचे त्रास कमी होतील. येणी वसूल होतील. परिवाराची साथ मिळेल. प्रवास टाळा. वाहन दुरुस्तीसाठी खर्च होईल. प्रेमीजनांना प्रतिकूल काळ आहे. सांभाळून रहावे. नोकरीत वादाचे प्रसंग. वैवाहिक जोडीदाराच्या मागण्या वाढल्यामुळे चिडचिड होईल. लाभाचे योग उत्तम आहेत. उपाय- शनिवारी छायादान करा.
धनु
शारीरिक तक्रारी कमी झाल्याने उत्साही असाल. कुटुंबातील व्यक्तीचे वागणे खटकेल. धनप्राप्ती कष्टाने होईल. प्रवास टाळावाच. शेजाऱयांशी किंवा भावंडांशी वाद संभवतात. गुप्तशत्रू षड्यंत्र आखत आहेत. सावध रहा. धोका असलेली गुंतवणूक टाळा. मानसन्मानाचे योग आहेत. उपाय- बुधवारी हिरवी मिठाई लहान मुलांना भेट द्या.
मकर
शेअर्समध्ये फायदा. संतती सुख उत्तम. भाग्याची उत्तम साथ आहे. मान सन्मानाचे योग आहेत. तब्येतीला सांभाळा. कौटुंबिक कलहामुळे मन नाराज होईल. वैवाहिक जीवनात मतभेदाचे प्रसंग येतील. वाहन चालवताना सावध रहा. खर्चाचे प्रमाण वाढण्याची शक्मयता आहे. उपाय- रविवारी तांब्याची वस्तू दान करा.
कुंभ
तब्येतीची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषतः ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी नियमित तपासणी करून घेणे गरजेचे आहे. वादाचे प्रसंग टाळा. जमिनीचे व्यवहार यशस्वी होतील. घेतल्या कामाला यश मिळेल. डोक्मयाला इजा होऊ नये याची काळजी घ्या. उपाय- ‘हं हनुमते नमः’ मंत्राचा शक्मय तितका जप करा.
मीन
लेखी व्यवहार यशस्वी होतील. प्रवासाचे योग आहेत. भावंडांचे सहकार्य मिळेल. वैवाहिक सुख उत्तम आहे. भाग्य साथ देईल. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. लाभ चांगला आहे. गुंतवणूक करणे सध्या टाळा. धावपळ जास्त झाल्याने तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. उपाय- शुक्रवारी देवीची ओटी भरावी.